मुंबई

मुंबईत पाण्याविना हाल

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत पाणीकपात लागू नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी अनेक विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्याचा दाब कमी असल्याने उपनगरांत सार्वजनिक ठिकाणी एक हंडा भरण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. हातातील कामे सोडून गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

ऑक्‍टोबर हीटमुळे लाही लाही होत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांच्या हालात भर पडली आहे.सप्टेंबरमध्ये वेरावलीतील जलबोगद्याचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता; मात्र तेव्हापासूनच अनेक विभागांत पाण्याची बोंब सुरू झाली आहे. उपनगरांमध्ये पाण्याची समस्या अधिक जाणवत आहे. 

दहिसरमध्ये गेल्या आठवडाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दहिसर-मागठाणे भागाला पाणी पुरवणारी मुख्य जलवाहिनी गंजल्यावर पाण्याचा दाब कमी झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले; मात्र अद्याप जलवाहिनी दुरुस्त झालेली नाही. त्याचबरोबर विलेपार्ले, जुहू आदी परिसरात अशीच परिस्थिती आहे. परिसरातील जुन्या चाळींमध्ये पाण्याची समस्या प्रामुख्याने जाणवत आहे. गावठाणात पाण्याची वेळ कमी झालेली नाही; मात्र कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे पूर्वी टाकी भरण्यासाठी दोन तास लागत असताना आता अडीच तास लागत आहेत, असे स्थानिक रहिवासी गॉडफ्री पिमेंटो यांनी सांगितले. घाटकोपर, विद्याविहार आणि कुर्ला परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कुर्ला परिसरात पाण्याचा दाब निम्म्याने कमी झाला आहे.

ऑक्‍टोबर हीटमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी स्थानिक तांत्रिक कारणांमुळे पाण्याची समस्या जाणवत होती; मात्र आता दुरुस्ती करण्यात आली असून पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
- अशोक कुमार तवाडिया, जल अभियंता, महापालिका

बुधवारी रात्री पाणी आलेच नाही. गेल्या आठवडाभरापासून समस्या जाणवत आहे. कधी पाणी येते; पण त्याचा दाब पूर्वीपेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यामुळे आवश्‍यक पाण्याचा साठा करताच येत नाही.
- वालचंद चव्हाण, रहिवासी, कुर्ला

ऑक्‍टोबर हीट आणि त्यात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कमालीचे हाल होत आहेत. आठ ते १० दिवसांपासून पाण्याची समस्या तीव्रतेने वाढली आहे. पाणीकपातीबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही, पण नळाला नेहमीपेक्षा कमी पाणी येत आहे.
- मनीष साळवी,  रहिवासी, बोरिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT