kalyan
kalyan 
मुंबई

कल्याण पूर्वला पाणी पुरवठा बंद 

रविंद्र खरात

कल्याण - कल्याण पूर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज शनिवार ता 8 डिसेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास फुटल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना त्रास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गाडी किल्ल्याजवळ मुख्य जलवाहिनी आज शनिवार ता 8 डिसेंबर पहाटे 2 च्या सुमारास अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा बंद करत जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. एकीकडे पाणी समस्या असताना ही घटना घडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत कल्याण पूर्वकरांची झाली आहे. दरम्यान जलवाहिनी दुरुस्त झाल्यावर पाणी पूरवठा केला जाईल, तो पर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT