Tansa Dam Overflow sakal
मुंबई

Tansa Dam Water : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा धरण ओव्हरफ्लो; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण 24 जुलै रोजी दोन दरवाजे उघडून ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन झाले दूर.

नरेश जाधव

खर्डी - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.15 मिनिटांनी दोन दरवाजे उघडून ओवरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. तानसा धरण दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहे.

भातसा धरणेही 65 टक्के भरले आहे. तर मोडकसागर धरण 91 टक्के भरले आहे. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली असून, सर्व धरणात पाण्याचा साठा वाढल्याने तूर्तास मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.

शहापूर तालुक्यातील तानसा धरणाखालील व लगत असलेल्या भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाश्यांनी सतर्क रहाण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांची पाऊसाअभावी रखडलेली शेतीच्या कामांना देखील तालुक्यात वेग आला असून, तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्याने भरलेल्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच जून महिन्यात पाऊस न पडल्याने येथील धरणातील पाणीसाठा कमी होतहोता त्यामुळे मुंबई मनपाने ठराविक ठिकाणी पाणी कपात सुरू केली होती.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यात धरण क्षेत्रात पाऊसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तालुक्यातील भातसा,मोडकसागर व मध्य वैतरणा धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT