मुंबई

Mumbai Weather Updates: मुंबईसह ठाण्यात थंडीचा कडाका वाढणार

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबई, ठाण्यातील किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज मुंबई प्रदेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
मुंबईतील आणि उपनगरातील किमान तापमानात 18 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली आहे. 

पुढील दोन दिवस हे वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात एकेरी आकड्यावर तापमान आल्याचे थंडीचा जोर वाढताना दिसतोय. मुंबई , ठाण्यातील किमान तापमानात आणखी घट होऊन ते 16 अंश सेल्सियस पर्यंतखाली येणार असून थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी दिवसभर मुंबईत - ठाण्यातील आकाश निरभ्र राहिले, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.  विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान एक अंकी होऊन थंडीची लाट येणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी युनि. 5.6 अंश से. नोंदवले गेले. पुढील 24  डिसेंबरपर्यंत मुंबईस संपूर्ण राज्यात आणि गोव्यात दिवसा हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून रात्री थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातले सोमवारी सकाळी नोंदवलेले किमान तापमान

मुंबई (कुलाबा) 18,परभणी युनि. 5.6,परभणी  8.1 , गोंदिया 7 , नागपूर 8.4 ,वर्धा 9.8 ,अकोला 9.6 ,पुणे 9.2 ,नाशिक 9.1 , औरंगाबाद 9.5 ,बारामती 9.2 ,जळगाव 10.5 , मालेगाव 10.8 , नांदेड  11 ,जालना 12 ,अमरावती 11.1 ,बुलडाणा 11.4 ,चंद्रपूर 10 ,ब्रह्मापुरी 10.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

(संपादन- पूजा विचारे)

weather update mumbai thane lowest minimum temperature

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT