Mumbai Weather Update Today  esakal
मुंबई

Mumbai : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Mumbai Weather Update Today : मुंबईत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून पावसामुळं हवामान खात्याकडून (Weather Department IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळतंय. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलीय.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, हवामान खात्यानं (IMD) 1 आणि 2 जुलै रोजी शहरातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्टसह येलो अलर्ट जारी केलाय. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळं गुरुवारी अनेक सखल भागात पाणी साचल्याचं महापालिका (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी सांगितलं. हिंदमाता, परेल, हाजी अली, डॉकयार्ड रोड, गांधी मार्केट आणि वांद्रे या भागात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली होती. तर, मुसळधार पावसामुळं बीएमसीनं अंधेरी मेट्रो पश्चिम उपनगरातील वाहतूक बंद केल्याचं कळतंय.

दरम्यान, मुसळधार पावसामुळं अनेक भागात पाणी साचलंय. तर, अनेक ठिकाणी लोक गुडघाभर पाण्यातून जाताना दिसत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरात 119.09 मिमी, पश्चिम उपनगरात 78.69 मिमी आणि पूर्व उपनगरात 58.40 मिमी पाऊस झालाय. शहरातील संततधार पावसामुळं काळबादेवी आणि सायन भागात इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनेमुळं कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT