मुंबई

लग्न, अंतिम विधी खुले; मग प्रार्थनास्थळे का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सुनिता महामुनकर


मुंबई : कोरोना साथीमध्ये मोजक्या लोकांना लग्न आणि अंतिमविधीला हजर राहण्याची परवानगी दिली जाते मग सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळेही खुली करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केली.

लग्न किंवा अंतिम विधी मध्ये वीस-तीसजणांना परवानगी दिली आहे, पण याठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असतो. मग देवदर्शनासाठी मनाई का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. या पाश्वभूमीवर प्रार्थना स्थळे मोजक्या संख्येने आणि मर्यादित वेळेत भाविकांसाठी उपलब्ध करण्याबाबत  विचार करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

केंंद्र सरकारने प्रार्थना स्थळे खुली करण्यावर बंधन लावलेले नाही, त्यामुळे प्रार्थना स्थळांवर जायला सशर्त परवानगी आहे, मात्र राज्य सरकारने यावर परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हवा, असे अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी खंडपीठाला सांगितले. 

जर लोकांनी मार्गदर्शक तत्वे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले तर त्यांना सशर्त परवानगी द्यायला हरकत नाही, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले. भांडुपमधील रहिवासी अंकित वोरा यांनी एड प्रफुल्ल शहा यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर आज न्या एस जे काथावाला आणि न्या माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. येत्या ता 15 ते 23 दरम्यान येणाऱ्या पर्युषण सोहळ्यात जैन मंदिर खुली करून पुजा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. श्वेतांबर मूर्ती पूजक जैन समूदायाला पुजा करण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. 

कोविड19 मध्ये मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रार्थना स्थळे खुली करणे हितकारक ठरेल, असा दावा याचिकेत केला आहे. याबाबत राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे निवेदन देण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकादाराला दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 13 रोजी होणार आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT