sachin sawant
sachin sawant 
मुंबई

'सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष CBI केव्हा सांगेल?'

दीनानाथ परब

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला (sushant singh rajput death) आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी याच दिवशी सुशांतचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांबरोबरच केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलनालय (ईडी) व केंद्रीय अमली पदार्थ विभाग (एनसीबी)सारख्या केंद्रीय यंत्रणांनी त्याचा तपास केला. सुशांतच्या आत्महत्येच्या संशयापासून सुरू झालेला तपास अमली पदार्थ सेवन व वितरणावर केंद्रित झाला. अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांची चौकशी झाली, पण वर्षभरानंतरही सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, या प्रश्नाचे अधिकृत उत्तर मिळालेले नाही. (When cbi will tell final conclusion about sushant singh rajput death sachin sawant questions)

याच मुद्यावरुन काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही प्रश्न विचारले आहेत. "सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्देवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे?" असे सवाल सचिन सावंत यांनी टि्वटरवरुन विचारले आहेत. सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

"त्याचप्रमाणे जर अँटिलीया कट रचणारे वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का?परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?" असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

"जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा" असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT