Sanjay Raut ANI
मुंबई

ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत

महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात ही आमची मागणी आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.

दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्यांमुळे रुग्णसंख्या जास्त आहे. देशातील अन्य राज्यात कोरोना चाचण्या तितक्या प्रमाणात होत नाहीत त्यामुळे तिथे रुग्णसंख्या कमी आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात ही आमची मागणी आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान म्हणतात, महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर कमी पडणार नाही. मग ही औषधे महाराष्ट्राला का कमी पाडली जात आहेत?. लोकांच्या जीवाशी का खेळताय?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

"ऑक्सिजन बाबत केंद्राने गांभीर्याने विचार करावा. उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतोय. गुजरात, उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाने लॉकडाउन करण्याचा आदेश दिला. मग तिथले मुख्यमंत्री का वेळ लावत आहेत?. लोकांच्या जीवाशी का खेळताय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. देशाची परिस्थिती हातघाईला आलीय. नियंत्रणाबाहेर परिस्थिती आहे."

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. ब्रेक द चेन साठी कडक लॉकडाउन लावावा अशी सरकारमधील मंत्र्यांची मागणी होती. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिव्हीरचे वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिव्हीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा" अशी मागणी राऊत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Father’s Day Gift Ideas : पापा मेरी जान! यंदा 'फादर्स डे' ला वडीलांना द्या 'या' 5 पैकी एक भन्नाट गिफ्ट, आणखी स्ट्रॉन्ग होईल बॉन्ड

Mumbai Crime: बॉस समजून पैसे पाठवले, पण घडलं विचित्रच; फसवणुकीतील ५.७५ कोटी रोखले, दिल्लीतून पाच जण अटकेत

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

SCROLL FOR NEXT