Ulhasnagar
Ulhasnagar 
मुंबई

वादळी वाऱ्यामुळे झाडे, लोखंडी पत्रे उडून पडले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी घरावरील लोखंडी पत्रेही उडून रस्त्यावर पडले. 

कल्याण-बदलापूर या महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलजवळ दोन वर्षांपूर्वी मोठे शेड बांधण्यात आलेले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु होताच दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेडचे 10-15 मोठ्या आकाराचे लोखंडी पत्रे उडून रस्त्यावर पडले. वाहने आणि नागरिक रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पत्रे उडाल्याची घटना समजताच सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, मुकादम दिलीप भोईर, किशोर लोट, राजेश कुलकर्णी, अग्निशमन दलाचे अधिकारी भास्कर मिरपगार आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

सकाळच्या सुमारास सतराम दास हॉस्पिटल रस्त्यावरील गुलमोहराचे झाड तुटून रस्त्यावर पडले. हा रस्ता वर्दळीचा असला तरी या घटनेत कोणाही व्यक्तीस हानी पोहोचली नाही. मात्र, तेथे उभ्या असलेल्या एका कारचे थोडे नुकसान झाले आहे. धोबीघाट येथे झाडे कोसळली आहेत, तसेच रेणुका सोसायटी येथे एक झाड घरावर कोसळल्याने पत्र्यांचे नुकसान झाले आहे. झाडे कोसळ्याच्या घटना जसजशा घडत होत्या तसतशे फोन अग्निशमन दलाला येत होते. त्यानुसार संबंधित विभागांतर्फे कार्यवाही केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT