Rape 
मुंबई

Kalyan Crime News : टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर अत्याचार; घटनेमुळे परिसरात खळबळ

रोहित कणसे

मुंबईच्या टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकर समोर आला आहे. लोकलने प्रवास करणारी ही महिला तिच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. दरम्यान या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकरा घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी निशांत चव्हाण याला अटक केली आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधीत पीडित महिला ही शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली होती. स्टेशनवर उतरल्यानंतर ही महिला शेजारीच असलेल्या रुळावरून आपल्या घराकडे जात होती.

यावेळी एकजण तिचा पाठलाग करत होता. पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत असल्यामुळे ती गाफील होती. पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. घटनेची वाच्यता कुठे केली तर जिवे मारण्याची धमकी देखील संशयित आरोपीने महिलेला दिली.

दरम्यान महिलेच्या पतीला संबंधीत प्रकाराची माहिती मिळताच त्यांने परिसरात राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. कल्याण रेल्वे पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT