Crime
Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : मंत्रालयासमोर नग्न आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वीज पुरवठा कंपनीच्या कारवाईच्या निषेधार्थ एका महिलेने सोमवारी संध्याकाळी मंत्रालयासमोर नग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 30 वर्षांची आरोपी महिला नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी आहे.

साल 2017 मध्ये, पिडीत महिलेने महाराष्ट्र राज्य वीज कंपनीच्या कार्यालयात तिच्या घराच्या वीज कनेक्शनबाबत आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तिच्याविरुद्ध तेव्हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील तपास अधिकारी तिचा मानसिक छळ करत असून मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे महिलेने सोमवारी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी महिलेने केली आहे. सोमवारी आंदोलनादरम्यान महिलेने सरकारवर महिलांवरील अत्याचाराचा आरोप करणारे बॅनर हातात घेतले होते. पोलिसांनी महिलेला सुरुवातील समुपदेशन करत समजवण्याचा प्रयत्न केला.

परंतु पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा महिलेने इशारा दिला. तसेच तिने आत्मदहनाची धमकी देखील दिली. अखेर पोलिसांनी अनुचित घटना टाळण्यासाठी तिला ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT