women damage private part when denial of marriage at mumbai
women damage private part when denial of marriage at mumbai 
मुंबई

...म्हणून प्रेयसीने केले प्रियकराच्या गुप्तांगावर वार

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः एक वर्षेभर प्रेमसंबंध ठेवले, प्रेमाचे नाटक करत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. परंतु, विवाहाबद्दलची विचारणा केल्यानंतर नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर वार केल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱयापासून विभक्त राहणाऱया महिलेशी फकरु फजदुरु रहेमान खान (30) याचे प्रेमसंबंध होते. फकरु केजीएन चौक, नवीवस्ती येथे राहणाऱया महिलेच्या घरी शनिवारी (ता. 6) रात्री झोपण्यासाठी गेला होता. या वेळी महिलेने त्याच्याकडे विवाहाबद्दलची विचारणा केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या रागातून तिने धारदार विळ्याने त्याच्या गुप्तांगावर वार केले. यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याच्या आवाजाने शेजारी राहणारे जागे झाले. शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून शारीरिक उपभोग घेणाऱया फकरु विरोधातही पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT