women's participation in blood donation camp
women's participation in blood donation camp sakal media
मुंबई

महिलांची रक्तदानात भरारी; रक्तदानातील महिलांचा टक्का वाढतोय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रक्तदानाबाबत (Blood donation) अनेक गैरसमज आणि न्यूनगंड असल्यामुळे महिलांचा त्यात नगण्य सहभाग असायचा; मात्र आता परिस्थिती बदलली असून रक्तदान शिबिरांतील (blood donation camp) महिलांचे प्रमाण २५ ते ३० टक्के वाढले (women's participation) असल्याचे समोर आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त (international women's day) केवळ महिलांसाठी आयोजित रक्तदान शिबिरांना आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जीवनदाता सामाजिक संस्थेने आज केवळ महिलांसाठी केईएम रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा अधिक महिलांनी शिबिराला प्रतिसाद दिला. आरोग्याशी संबंधित विविध कारणास्तव त्यातील ९५ महिलांना रक्तदान करता आले. गेल्या दोन वर्षांत कधीही हा आकडा ५० वर गेला नव्हता.

संस्थेकडून मुंबईत विविध ठिकाणी पाच मोठी रक्तदान शिबिरे घेतली जातात. शिबिरात साधारण एक हजार जण रक्तदान करतात; मात्र त्यातील महिलांचे प्रमाण पाच टक्केही नसायचे. आता मात्र रक्तदानाबाबत महिलांमध्ये जागृती वाढली असून त्यांचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे जीवनदाता सामाजिक संस्थेचे संस्थापक गणेश आमडोसकर म्हणाले. सध्या हजारांपैकी तीनशे ते साडेतीनशे महिला रक्तदान करतात, असेही ते पुढे म्हणाले.

अनेक महिलांना आपल्यातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याचे सतत वाटते. त्यामुळे त्या कधीही रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. काही महिलांना थायरॉईड, वजन कमी भरणे आदी समस्यांचा सामना करावा लागतो, असे संस्थेच्या वीणा आमडोसकर यांनी सांगितले. महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यातील बऱ्याच जणी रक्तदानासाठी योग्य नसल्याचे लक्षात येते. पूर्वी रक्तदानासाठी आलेल्या महिलांच्या ‘रिजेक्शन’चे प्रमाण ७० टक्के होते. आता ते ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ‘घे भरारी’च्या माध्यमातून आम्ही महिलांना रक्तदानासाठी तयार करत आहोत. अनेक महिला आपला न्यूनगंड सोडून सहभागी होत आहेत, असे गणेश आमडोसकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT