bridge
bridge 
मुंबई

वसईतील सायवन-मेढे पुलाचे काम प्रलंबित, हजारो ग्रामस्थांची गैरसोय

प्रसाद जोशी

वसई : वसई पूर्व भागातील तानसा नदीवरील सायवन-मेढे नवीन पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने हजारो नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नवीन पुलाचे काम सुरू असून जुना पूल नादुरुस्त झाल्याने नवा पूल उभारण्यात येत आहे. हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. कॉंग्रेसचे वसई तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी केली आहे. 

तानसा नदीवरील सायवन मेढे जुन्या पुलाची अवस्था सध्या अतिशय खराब झाली असून पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. जुना पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने वडघर, कळभोन, आंबोडे, मेढे, भिनार व परिसरातील आदिवासी पाडे अशा 15 ते 20 हजार नागरिकांचा संपर्क तुटतो व विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, भाजीपाला विक्रेत्या महिला आदींचे अतोनात हाल होतात. मध्यंतरी लॉकडाऊनचे कारण देत मजूर मिळत नसल्याने पुलाचे काम थांबविल्याचे सांगण्यात येत होते. ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडणारा हा पूल आहे; परंतु गेल्या 2 वर्षांपासून पुलाचे काम धिम्यागतीने सुरू आहे. या पुलासाठी एकूण 2 कोटी 60 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना या नव्या पुलामुळे पावसाळ्यात गैरसोय होणार नाही, तसेच वाहनांना ये-जा करणे सोईस्कर होणार आहे. या पुलासाठी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. 
या संबंधित सार्वजनिक बांधकाम वसई उप विभागाचे अभियंता प्रशांत ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, नालासोपारा शहर अध्यक्ष कुमार काकडे उपस्थित होते. 

विकासकामे सुरू झाली आहेत. मग, सायवन पुलाचे काम का केले जात नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जुन्या पुलामुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पुलाचे काम तातडीने सुरू करावे. 
- राम पाटील, वसई तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस. 

वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील सायवन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. लॉकडाऊनमुळे अडचण निर्माण झाली होती. नागरिकांना गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. 
- प्रशांत ठाकरे, अभियंता, सर्वजनिक बांधकाम उपविभाग, वसई. 

(संपादन : वैभव गाटे)

Work on Saivan Medhe bridge in Vasai pending

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT