raj thackeray, amit thackeray Google
मुंबई

Worli Vidhan Sabha: वरळीतून अमित ठाकरे नव्हे तर मनसेच्या 'या' फायरब्रँड नेत्याला मिळणार तिकीट; राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

युवासेनेचे अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. यामुळं ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत याठिकाणी होईल अशीच शक्यता वर्तवली जात होती. पण आता यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.

कारण वरळीतून मनसेच्या दुसऱ्याच एका फायरब्रँड नेत्याला इथून तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे या नेत्याच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत. २१ सप्टेंबर रोजी संदीप देशपांडे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमातच संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

याच कार्यक्रमात संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे संदीप देशपांडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. वरळी समस्या आणि प्रश्न यासंदर्भात या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये संदीप देशपांडे लक्ष घातलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT