मुंबई

भाडेकरारासाठी झेरॉक्सप्रत अधिकृत कागदपत्र नाही; उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : एखाद्या भाडेकरारामध्ये दाखल केलेल्या छायांकित प्रती अधिकृत कागदपत्रे असू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला आहे. 

घरमालक आणि भाडेकरूच्या एका प्रकरणात भाडेकराराची मूळ प्रत दाखल करण्यात आली नव्हती. भाडेकरूकडून कराराची छायांकित प्रत देण्यात आली होती. नागपूरमधील एका जागेचा ताबा घरमालकाने भाडेकरूला दिला होता. मात्र काही महिन्यानंतर जागेचा ताबा देण्यास भाडेकरूने नकार दिला. भाडेकरूला हुसकावण्यासाठी मालकाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तेथे भाडेकरूच्या वतीने भाडेकरारची छायांकित प्रत दाखल केली होती. याला घरमालकाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. संबंधित कागदपत्रे मूळ कागदपत्रे नाही त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे कठीण आहे, अशा वेळी हा करार ग्राह्य धरता येणार नाही, असा बचाव मालकाच्या वतीने करण्यात आला. यावर संबंधित कराराची नोंदणी करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. याविरोधात घरमालकाने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या मनीष पितळे यांच्या पुढे याचिकेवर सुनावणी झाली.

निश्चित निर्धारित कागदपत्रे हवीत
 न्यायालयाने घरमालकाचा युक्तिवाद ग्राह्य मानला. महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यातील कलम 2 (1) नुसार छायांकित प्रती कागदपत्रे म्हणून नमूद करता येणार नाही. मालमत्तेसंबंधीत कागदपत्रांमध्ये हक्क आणि अधिकार स्पष्ट होत असतो, त्यामुळे त्यामध्ये निश्चित निर्धारित कागदपत्रे हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्दबातल केला.

Xerox does not have official documents for the rental agreement

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

SCROLL FOR NEXT