वाडा ः दारुसाठी वीजेच्या खांबावर चढलेला तरूण. (छायाचित्र ः दिलीप पाटील) 
मुंबई

दारूसाठी तरुण चढला थेट विजेच्या खांबाबर...

सकाळ वृत्तसेवा

वाडा ः तालुक्‍यातील कुडूस येथील तरुणाने आपली दारूची हौस पूर्ण करण्यासाठी विद्युतखांबावर चढून जीवाशी खेळ केल्याची घटना कुडूस येथे रविवारी (ता.१२) रात्री घडली आहे. विद्युतखांबावर चढून तरुणाने दारूची मागणी केल्याने कुडूस विभागात एकच खळबळ उडाली असून सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. 

रविवारी रात्री रमेश मांजे (वय २१) हा मद्यधुंद तरुण प्रियदर्शनी कंपनीशेजारील उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीच्या खांबावर चढला. तो वर चढताना दारूची मागणी करत होता. मला दारू देणार असाल, तरच मी खाली येतो; अन्यथा खाली येणार नाही, असे सांगत तो खांबावर अगदी वरपर्यंत पोहोचला. हा संपूर्ण प्रकार विद्युत वितरण कंपनी कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत त्याने तत्काळ वीजप्रवाह खंडित करून या संपूर्ण घटनेची माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता सुखलाल बोखारिया यांना दिली.

त्यानंतर तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने या तरुणास विद्युत पोलवरून सुरक्षित खाली उतरवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या तरुणास समज देऊन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

या संपूर्ण प्रकाराने कुडूस विभागातील विद्युतपुरवठा तासाभरासाठी खंडित करण्यात आला होता. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली असून कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता बोखारिया यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT