crime news esakal
मुंबई

Mumbai Crime : पत्नीशी अनैतिक संबंधातून 17 वर्षीय मुलाची हत्या; मृतदेहाचे केले तुकडे, आरोपी अटकेत

मुंबईतील चेंबूर परिसरात एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्येची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील चेंबूर परिसरात एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्येची घटना घडली होती. पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी शफीक शेखने अल्पवयीन ईश्वर मारवाडीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची माहिती तपासात मिळत आहे.

घटनेनंतर या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने आरोपीला अटक केली. आरोपीने पोलिसांसमोर ईश्वरची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सध्या न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चेंबूर परिसरात स्थित म्हाडाच्या इमारतीत आरोपी आणि मृत ईश्वर वास्तव्यास होते. ईश्वरचा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपी शफीकला संशय होता. यामुळे आरोपी शफीकने सोमवारी ईश्वरला घरी भेटण्यासाठी बोलावले होते. घरात दोघांमध्ये कडाक्याचे भांडणं झाले.

वाद विकोपाला जाऊन आरोपी शफीकने ईश्वरच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. एवढेच नाही हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे करून त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलं. ईश्वर घरी न परतल्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्र शोध घेत होते.

ईश्वरचा शोध घेत असलेल्या त्याच्या मित्रांना शफीकनेच ईश्वरला गायब केल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आरोपी शफीकनेच ईश्वरची हत्या केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. पोलिसांना आरोपीच्या घरात ईश्वरच्या मृतदेहांचे तुकडे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी शफीकला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT