zika virus sakal media
मुंबई

मुंबईत नियमित आजारांच्या चाचण्यांसह 'झिका'च्या चाचण्या, महापालिका सतर्क

मिलिंद तांबे

मुंबई : झिका आजाराबाबत (Zika decease) पालिका सतर्क झाली असून नियमित आजारांसह 'झिका'च्या चाचण्या (zika test) करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या (bmc) वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमेश भारमल (ramesh bharmal) यांनी दिली. ताप आलेल्या रूग्णांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया (dengue test) यासारख्या आजारांमध्ये ज्या रूग्णांची चाचणी ही निगेटिव्ह येईल , अशा रूग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी (zika virus test) करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (Zika decease-dengue test-ramesh bharmal-zika virus test-bmc-nss91)

झिका आजाराचा एक रुग्ण पुण्यात सापडल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. झिका च्या संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे, तसेच या रूग्णांचे सातत्याने निरीक्षणही करण्यात येणार आहे. एडिस जातीच्या डासांपासून झिका विषाणूचा संसर्ग होतो. तसेच डेंग्यू आणि चिकुनगुनिया व्हायरसच्या माध्यमातूनही हा आजार पसरतो. म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच झिकाची लक्षणे असणाऱ्या रूग्णांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत.

गर्भवती महिलांना या आजाराचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग झिकाच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहे. झिकाची चाचणी करण्यासाठी आर टी-पीसीआर चाचणी करण्यात येते. सध्या झिकाची चाचणी ही कर्मशिअल तत्वावर खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्याची परवानगी नाही. मुंबईत पालिकेच्या एकमेव कस्तुरबा रुग्णालयात सध्या झिका च्या चाचण्या करण्यात येत आहेत.

''झिका बाबत पालिकेचं आरोग्य विभाग सतर्क आहे. संशयित रुग्णांच्या स्क्रिनिंग सह चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत देखील स्क्रीनिंग सुरू करण्यात येणार आहे.''

-डॉ. रमेश भारमल , संचालक,वैद्यकीय शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT