students organic farming
students organic farming sakal media
मुंबई

विक्रमगड : शाळेत विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे अन् फुलवली भाज्यांची बाग

अमोल सांबरे

विक्रमगड : मुलांना सेंद्रिय शेतीतून (Organic farming) फळभाज्या व पालेभाज्या यांचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून (teachers guidance) जि. प. शाळा गुरवपाडा (zp school guravpada) (सवादे) येथे गेल्या तीन वर्षांपासून किचन गार्डन शेती (Garden farming) केली जात आहे. (Zilha parishad guravpada school students learnt organic farming and flowered vegetable garden)

गेल्या काही वर्षांपासून शाळेत सुहृद् फाउंडेशन ही समाजसेवी संस्था मुलांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करतात. तपासणी केल्यानंतर मुलांमध्ये प्रोटीन व अनेक जीवनसत्वाचा कमतरता जाणवली त्यामुळे शाळेत किचन गार्डन तयार केले. या किचन गार्डन मध्ये खोदकाम, वापे करणे, भाज्यांची लागवड करणे, भाज्यांना पाणी देणे, सेंद्रिय खते देणे, तण काढणे व भाज्यांना काठीचा आधार देणे यासारखी कामे मुले स्वतः शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान घेत भाज्या पिकवतात.

शाळेतील किचन गार्डन मध्ये मेथी, पालक, आंबाडी, कोथिंबीर व मुळा या सारख्या पालेभाज्या आणि टोमॅटो, वांगी, मिरची व कांदा यासारख्या फळभाज्या लागवड केले आहे. याचा वापर शालेय पोषण आहारात केला जातो. सध्या कोरोना विषाणूमुळे पोषण आहार शाळेत शिजवला जात नाही त्यामुळे आम्ही मुलांना भाज्या कच्च्या खाण्यास देत आहोत. सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्याने त्या भाज्या चविष्ट असतात व त्यातून आरोग्याची हानी पण होत नाही. त्यामुळे मुलांचे आरोग्य निरोगी राहते, मुले आवडीने आहार खातात. मुलांना सेंद्रिय शेती कशी करायची याचे ज्ञान होते, भाज्यांची लागवड कधी व कशी करायचे याचे पण ज्ञान लहान वयातच होत आहे.

पालकांकडे मुबलक शेती व पाणी असून पण भाज्या लागवडीचे ज्ञान नसल्याने स्वतःच्या शेतात न करता बोटीत, वित्तभट्टीवर, रोजाने जायचे त्यामुळे अनेक कुटुंबाचे स्थलांतर व्हायचे. कुटुंबाचे स्थलांतर झाले का शाळेतील मुलांचे पण स्थलांतर होत होते. शाळेतील पालक मिटींगला सतत किचन गार्डन शेतीची माहिती दिल्याने व सतत शेतीत कोणत्या भाज्या लावल्या पाहिजे व कोणते सेंद्रिय खते वापरले पाहिजे याची माहिती सांगितल्याने आज याचाच फायदा असा झाला की पालकांनी मुलांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनांनी आज 14 पालकांनी स्वतःच्या शेतात भाज्या लावल्या आहेत. त्याचा वापर घरी खाण्यासाठी व मार्केट मध्ये विकण्यासाठी केला जातो. त्यांना त्यातून पैसे मिळाल्याने पालकांचे स्थलांतर थांबले त्यामुळे मुलांचे पण स्थलांतर थांबले आहे. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबिवले जात असल्याने विद्यार्थी 100% उपस्थित राहतात.

किचन गार्डन शेती करताना सुह्रद फाउंडेशन, केंद्रप्रमुख शंकर हडबाळ, शाळेचे मुख्याध्यापक केशव भोये,शिक्षक सुरेश भांड व दशरथ धुमाळ यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले.

"शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. यातून विद्यार्थ्यांना लहान वयातच योग्य प्रकारे शेतीचे प्रत्येक्ष ज्ञान मिळाले."

-शंकर हडबाळ, केंद्रप्रमुख, विक्रमगड

"आम्ही किचन गार्डन शेती ही शाळेतून पालकांपर्यंत घेऊन जाण्यास यश मिळाले त्यामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ झाले व मुलांचे स्थलांतर थांबल्यामुळे 100% उपस्थिती वाढली."

- दशरथ धुमाळ, शिक्षक

"शाळेत किचन गार्डनचा उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीचे ज्ञान मिळेल. त्यातून मुलांना शेतीची आवड निर्माण झाली. "

- केशव भोय, मुख्याध्यापक

"आम्ही सर्व मुले शेतीची मशागत कशी करतात शेतामध्ये भाजीपाला कसे लावतात सेंद्रिय खताचा कसा वापर केला जातो हे सर्व आम्ही या किचन गार्डन मधून शिकलो आम्हाला स्वतः भाज्या तयार करून स्वतः खाण्यास खूप खूप आवडले."

- रोहित खाले, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT