Zomato  Sakal
मुंबई

Zomato Delivery Boy on Strike: झोमॅटोचे डिलीव्हरी बॉय संपावर, संपाला शिंदे गटाचा पाठिंबा; काय आहे कारण?

झोमॅटोचे डिलीव्हरी बॉय आजपासून संपावर, ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांची गैरसोय

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऑनलाईन खाद्यपदार्थ घरोघरी पुरवणाऱ्या फुड कंपनी झोमॅटोच्या मुंबईतील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय आजपासून संपावर जाणार आहेत.

झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय यांच्या संपाला शिंदे गट प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वामध्ये सर्व डिलिव्हरी बॉय हा लढा लढणार आहेत. दरम्यान, मुंबईतील झोमॅटो डिलिव्हरी बॉईजनी पुकारलेल्या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

काय आहेत झोमॅटो डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या?

डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्या आणि पैसे वाढवून मिळावे. पीक अप 3 किमी आणि ड्रॉप 7 किमी असावा. जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घेण्यात यावं. रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा. इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा आणि इतर मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर जाणार आहेत.

या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT