Aditya Thackeray
Aditya Thackeray e sakal
मुंबई

BEST होणार १०० टक्के इलेक्ट्रिक; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतली बेस्ट बस आता लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली आहे. त्यासोबत डिजिटल कार्डचं अनावरणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हे कार्ड रिचार्ज करता येऊ शकतं. तसंच केवळ शंभर रुपयांत हे कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सध्या ३३३७ बस उपलब्ध आहेत. १० हजार बसची गरज आहे. या बस १०० टक्के पर्यावरण पूरक असाव्यात, त्यातल्या सगळ्या इलेक्ट्रिक हव्यात. या सर्व बसपैकी निम्म्या बस डबल डेकर असतील अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,"बेस्टमध्ये चढलं की सतत पुढे चला असं म्हटलं जातं. असंच आपणही आता पुढे जात आहोत, पुढे जात राहणार. पुढे चला हाच आपला मंत्र राहिलेला आहे. बेस्टला पुढे कसं नेता येईल यावर सतत बोलणं सुरू असतं. कारण बॉम्बहल्ले, पूर, कोविड काळ या सगळ्यात बेस्ट कायम धावत राहिली आहे. बेस्ट खरंच बेस्ट आहे. बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकपासून सुरू झाला आता आपण पुन्हा इलेक्ट्रिककडे आलोय. डबलडेकर बस हव्यात असा माझा आणि मुख्यमंत्री महोदयांचा कायमच आग्रह राहिलेला आहे."

कसं असेल डिजिटल कार्ड?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढच्या आठवड्यात डिजिटल कार्डचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बेस्ट प्रवासी आता बेस्ट कंडक्टरकडून किंवा आगारात जाऊन १०० रुपयात कार्ड खरेदी करू शकतील. या कार्डला रिचार्ज करता येणार आहे. प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारावर असलेल्या मशीनवर कार्ड लावून "टॅप इन" करतील , आणि त्यानंतर पुन्हा बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन तिकीट मिळणार आहेत. बेस्टच्या प्रत्येक बसमध्ये हे कार्ड मशीन बसवण्यात आले आहेत. “चलो" या कंपनीद्वारे हे कार्ड तयार करण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT