Ravishankar
Ravishankar 
myfa

चेतना तरंग : ध्यानासाठी पाच सोप्या सूचना

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

'ध्यान करणे ही काही करण्याची नव्हे, सोडून देण्याची कला आहे...’ आपल्यापैकी बऱ्याच जणांमध्ये ध्यान हा शब्द अपयशाची आणि पराभवाची भावना निर्माण करतो. ध्यानाचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया, ‘मी कधीच शांत बसू शकणार नाही, मी प्रयत्न केला पण माझे मन खूपच वेगळे वाटले,’ अशा आहेत. गुरूकडून एखादा मंत्र घेण्यापूर्वी मलाही वाटले, की मी डोळे पाच सेकंदांपेक्षा जास्त काळ बंद करून शांत बसू शकणार नाही. मी ध्यानावरची भरपूर पुस्तके वाचली आणि त्याबद्दल विचार करणे मला आवडले, परंतु प्रत्यक्ष अभ्यासाच्या वेळी मला अपयशी वाटले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरूकडून शिकल्यानंतर मला समजले, मी ध्यान करण्यासाठी सक्षम की अक्षम हा प्रश्‍न नसून, ध्यान योग्यप्रकारे कसे करावे हे समजले अथवा नाही, हा आहे. ध्यान करण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात असताना त्याचे उत्तम तंत्र शोधून काढल्याने आणि आपण योग्यप्रकारे ध्यानधारणा करत असल्याचे समजल्यावर छान वाटते.

ध्यानासाठी हे करा...
1) मार्गदर्शित ध्यानामधील सूचना अनुसरणे
ध्यानामधील काही सूचना आणि मार्गदर्शनांचे पालन केल्यावर ध्यानात खोलवर जाणे सोपे होते. अनेकांसाठी सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मार्गदर्शित ध्यान. रेल्वेरूळ रेल्वेगाडीला दिशा दाखवितात, त्याचप्रमाणे मार्गदर्शित सूचना असलेले ध्यान उच्चप्रतीच्या ध्यानाचा अनुभव देतात.

2) ध्यानाकडून कोणत्याही अपेक्षा न करणे
गाडी चालवताना काही वेळा तुम्हाला सुंदर देखावे व रस्ता स्पष्ट दिसतो, काही वेळा तुम्ही रहदारीमध्ये अडकलेले असता. तरीही, तुम्ही इच्छित स्थळी पोचता. त्याचप्रमाणे, ध्यानाच्या प्रक्रियेत आपले मन विचारांमध्ये व्यग्र असो किंवा शांत आनंदाच्या स्थितीत, ध्यान त्याचे कार्य करतेच. त्यामुळे तुमची विश्रांती, मनाची शुद्धी आणि चैतन्य विस्तारते. ध्यान करताना मन अशांत असल्यास आपण त्यावेळचे ध्यान कसे झाले, याबाबत विचार करत बसतो. तथापि, ध्यान चांगले झाले का वाईट याची निवड करण्यापेक्षा हे सर्व अनुभव चिंतामुक्त होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत, हे समजून घ्या. 

3) सकारात्मक बदलांचा अनुभव येणे 
बरेचजण ध्यान करताना डोळे मिटून काय अनुभव येतात, याकडे लक्ष देतात. मात्र, तुम्हाला दिवसभरात अधिक शांतता, विश्रांती, वैचारिक स्पष्टता आणि इतरांच्या गरजांबद्दल संवेदनशीलता आढळत असल्यास तुमचे ध्यान व्यवस्थित होत असल्याचे समजा. तुम्हाला दिवसभर आनंदी आणि प्रसन्न वाटत असल्यास तुम्ही नक्कीच योग्य मार्गावर आहात. तुमच्यामधील बदल खूप सूक्ष्म असतील व ते तुम्हाला जाणवणारही नाहीत, तरीही तुम्ही योग्य ध्यान करीत असाल. यावेळी तुमच्या मनात शंका असल्यास शिक्षकाला विचारा.

4) इच्छापासून अलिप्तता किंवा मुक्तता 
तुम्ही इच्छेत आणि काळजीमध्ये अडकता का? प्रत्येकजण वासनांचा आणि इच्छांचा अनुभव घेतो. ध्यानाचा उद्देश सर्व इच्छा नष्ट करणे नाही, मात्र त्याचा दीर्घकालीन सराव तुम्हाला वासनांपासून अलिप्तपणाची भावना विकसित करण्यास मदत करतो. ध्यानामुळे इच्छा तुम्हाला नियंत्रित करण्याऐवजी तुम्ही इच्छांना नियंत्रित करत असल्याचे जाणवेल. तुम्हाला इच्छा असल्यास हरकत नाही, पण तुम्ही म्हणजे फक्त वासना किंवा इच्छाच, असे होऊ देऊ नका. मला काही नको आहे, मला काही करायचे नाही, मी काही नाही या वृत्तीने ध्यान होते.

5) आरामदायी आसन 
ध्यान नेहमी बसूनच करावे. सोफा, खुर्ची, पलंग किंवा जमिनीवर बसा, पण ध्यान करतेवेळी आडवे, झुकत नाही ना हे पाहा. आडव्या स्थितीत झोप येते. ध्यान करतेवेळी पाठीचा कणा सरळ असावा. सखोल ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी आपले आसन आरामदायक असणे महत्त्वाचे आहे. सरळ बसल्यामुळे शरीरात वेदनांनी विचलित झाल्यासारखे वाटत असल्यास, शारीरिक तणाव सोडण्यासाठी आणि सामर्थ्य आणि लवचिकता विकसित होण्यासाठी योगासनांचा अभ्यास करावा. योगासने केल्याने ध्यान करतेवेळी आसनस्थ स्थिती आरामदायी होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT