rain-tips
rain-tips 
myfa

हेल्थ टिप्स : पावसाळ्यात घ्या काळजी... 

सकाळवृत्तसेवा

हवामानातील बदल आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो. या बदलांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्या कोरोनाच्या साथीत आपण पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात अपचन, सर्दी-खोकला आदी विकार आढळतात. अनेकजणांना अशक्तपणाही जाणवतो. खालील काही टिप्स तुम्हाला निरोगी ठेवायला नक्कीच मदत करतील. 

जड पदार्थ टाळावेत. 
पावसाळ्यात आंबट, अति तेलकट, खारट पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे अपचन, पित्त वाढण्यासह पचनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात हलके पदार्थ घ्यावेत. मुगाची डाळ, मका, खिचडी, शिजवलेले सलाड, ताजी फळे आदींचा आहारात समावेश केल्यास अपचन होणार नाही. 

पालेभाज्या स्वच्छ धुणे. 
आपल्या आरोग्यासाठी पालेभाज्या उपयुक्त असतात. मात्र जमिनीलगत असल्यामुळे पावसाळ्यात त्यांना माती लागते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पालेभाज्या घरी आणल्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच खाव्यात. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कच्च्या पालेभाज्या खाणं टाळावे. 

योग्य तेलाची निवड 
पावसाळ्यात स्वयंपाक करण्यासाठी पचनाला हलके तेल वापरावे. या ऋतूत शेंगदाण्याचे किंवा मोहरीचे तेल वापरू नये. त्याऐवजी सूर्यफूलाचे तेल, ऑलिव्ह ऑइल वापरावे. पचनाला जड असणारे तेल वापरल्याने अपचन होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाहेरील पदार्थ टाळावेत. 
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सध्या कोरोना व लॉकडाउनमुळे बाहेरील पदार्थ खाण्यावर मर्यादा आल्या आहेत. काहीजण पार्सल मागवत आहेत. मात्र. शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT