हसण्यासाठी जगा : विचारांचा पाऊस, मनाचे ओहोळ! sakal news
myfa

हसण्यासाठी जगा : विचारांचा पाऊस, मनाचे ओहोळ!

आकाश भरून येतं. थेंबाथेंबाने सुरू होणारा पाऊस, पुढं रिपरिप करत पडायला लागतो. जमिनीवर, डोंगरांवर पडणारं हे पाणी ओहोळ, ओढे, नाले, नद्या यातून वाहत समुद्राकडं जातं

मकरंद टिल्लू

आकाश भरून येतं. थेंबाथेंबाने सुरू होणारा पाऊस, पुढं रिपरिप करत पडायला लागतो. जमिनीवर, डोंगरांवर पडणारं हे पाणी ओहोळ, ओढे, नाले, नद्या यातून वाहत समुद्राकडं जातं. पुढच्या वर्षी पडणारा पाऊस, मागच्या वर्षी तयार झालेल्या ओहोळतूनच वाहतो. वारंवार पाणी वाहत गेल्यानं हळूहळू तो ओहोळ मोठा होत जातो.  त्याचा नाला तयार होतो. मनामध्येदेखील सतत विचारांचा पाऊस पडत असतो. आजूबाजूची परिस्थिती, संस्कार, शिक्षण, मैत्री अशा अनेक गोष्टींतून मनाची जडणघडण होत असते.  मनात येणारे विचार भावनांच्या ज्या ओहोळात पडतात, तिथूनच ते पुढं वाहत जातात. त्यातून त्या व्यक्तीचा स्वभाव तयार होत जातो.

काही लोकांना सतत कुरकुरण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीत ते त्रुटी काढू शकतात. अशा व्यक्तीला लॉटरीचं तिकीट लागतं. सर्व जण त्याचं अभिनंदन करतात. मात्र, त्या वेळेला ती व्यक्ती कुरकुरत सांगते, ‘दहा रुपयाची दहा तिकीट घेतली होती. त्यापैकी एकच लागलं. नऊ तिकिटांचे पैसे वाया गेले.’ आयुष्य जगताना कुरकुरण्याचे काही प्रसंग घडतात. ते जगण्याचे ओहोळ असतात, पण हळूहळू त्यांचं ओढ्यात रूपांतर होतं. पुढं पुढं मनात येणारा विचारांचा पाऊस त्यातच अडकत जातो. त्यातून कुरकुरणारा स्वभाव तयार होतो.

हॉटेलमध्ये लोकं जेवायला जातात. अचानक एखाद्या टेबलावरून रागावण्याचा आवाज येतो. आजूबाजूची लोकं चमकून बघायला लागतात. एखाद्या किरकोळ कारणावरून ती व्यक्ती वेटरला रागवत असते. बोलताना ती मान वळवून इतर टेबलावरील लोकांकडे पाहते. त्यानंतर सभेत बोलावं तसं ती व्यक्ती वेटरकडं बघण्याऐवजी इतर लोकांकडं बघून भावना व्यक्त करायला लागते. लोकांच्या नजरेतील अप्रूप त्याच्या बोलण्याला बळ देतं!... मनाविरुद्ध एखादी घटना घडली की व्यक्तीला राग येतो. त्या व्यक्तीच्या रागवण्याला प्रतिष्ठा मिळाली, की पुन्हा पुन्हा तसं वागण्याची त्याला प्रेरणा मिळते. अशी माणसं आनंदाच्या समारंभातदेखील कोणाला तरी रागवतात. असं रागवल्यानंतर त्यांच्यासाठी तो समारंभ आनंदाचा होतो! रागाच्या या ओहोळाचा पुढं समुद्र होतो.

गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीचं पाकीट मारलं जातं. आजूबाजूचे सगळेजण दुःख व्यक्त करतात. ती व्यक्ती मात्र आनंदात असते. सगळे जण विचारतात, ‘‘तू एवढा आनंदात का?’’ तो म्हणतो, ‘‘काल एटीएममधून दहा हजार रुपये काढले होते. बायकोनं खर्चाला मागितले होते. पाकिटात पाचशेच रुपये होते. बरं झालं! काल माझं पाकीट नाही मारलं!! खर्चाला पैसे मिळाले म्हणून बायको खूष, पैसे चोरीला गेले नाही म्हणून मी खूष!’’ काही व्यक्ती कायम आनंदी असतात. घडलेल्या प्रसंगातून त्या आनंद शोधतात. ओहोळ, ओढे, नाले, तर कधी कधी नद्यादेखील आटतात. पण अशा या लोकांच्या मनातले आनंदाचे झरे कायम वाहत राहतात.

प्रत्येकाने आपल्या मनातील विचारांचा आणि ओहोळांचा अभ्यास करण्याची गरज आहे. भीती, मत्सर, राग, तिरस्कार यांऐवजी विश्वास, समाधान, प्रेम, उत्साह, आनंद, आशावाद यांचे चर खणून विचारांना दिशा दिली, तर जगणं सकारात्मक होतं! आपल्या मनात कोणत्या भावनांचा समुद्र तयार होतो आणि त्याची वाफ तयार होते, त्यावरच आयुष्यातील पुढचा पावसाळा अवलंबून असतो!!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT