ravishankar
ravishankar 
myfa

चेतना तरंग : दिव्यत्वाचे वसतिस्थान 

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

संस्कृतमध्ये ‘रा’ म्हणजे, ‘जे तेजस्वी आहे ते’. आणि ‘म’ म्हणजे, ‘मी स्वतः’. माझ्या अंतरंगात चमकते तेच राम आहे. अस्तित्वाच्या प्रत्येक कणात असलेला तेजस्वीपणाच राम आहे. दशरथ आणि कौसल्येच्या पोटी राम जन्मला. दशरथ म्हणजे संस्कृतमध्ये ‘दहा रथ असलेला.’ पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचे ते सूचक आहे. कौसल्या म्हणजे संस्कृतमध्ये ‘कुशल.’ दहा रथांचा कौशल्यपूर्ण सारथीच रामाला जन्म देऊ शकतो. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये कौशल्याने वापरली जातात, तेव्हा आत तेज निर्माण होते. रामाचा जन्म अयोध्येत झाला. संस्कृतमध्ये अयोध्या म्हणजे ‘जिथे कोणतेही युद्ध होऊ शकणार नाही, अशी जागा.’

आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नसेल, तेव्हाच तेजाचा उदय होऊ शकतो. रामाचा भाऊ लक्ष्मण सुमित्रेच्या पोटी जन्मला. सुमित्रा म्हणजे उत्तम मित्र. हे दहा जण तुमच्याशी सहकार्य करतात, तेव्हा सजगता उत्पन्न होते. पुष्कळदा आपण आपल्यातील तेजाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्ही तेजस्वी आहात याची जाणीव ठेवा. अनेकदा लोक म्हणतात, ‘‘जसे आतून आहात तसेच बाहेरून व्हा!’’ मी विचारतो, ‘‘हे कसे शक्य आहे?’’ अंतरंगात तुम्ही आहात एक अथांग सागर आणि अनंत आकाश. बाह्यरंगी तुम्ही मर्यादित आहात- ‘‘अगदी क्षुद्र आकाराचा एक साधा अज्ञानी माणूस.’’ अंतरंगात आहे, ते प्रेम, सुंदरता, कारुण्य आणि देवत्व - सारे पूर्णपणे बहिर्रंगात प्रकट होऊ शकत नाही. वरकरणी दिसतात ते असतात केवळ वर्तणुकीचे वरवरचे पापुद्रे. विचारा बरे स्वतःला, ‘खरेच मी वागणुकीचा नमुना आहे का?’ मी खरोखरच मर्यादित शरीर आणि मनाचा एक मेळ आहे का?’ अजिबात नाही. तुम्ही आतून असता तसे बाहेरून अजिबात नाही. तुमच्या अंतरंगाची बाहेरच्या आवरणाशी गफलत करू नका आणि तुमचे आतील असीम देवपण दाखवू नका, कारण देवत्व सहजासहजी समजून घेतले जात नाही. काहीसे गूढ राहू द्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT