nagpur sakal
Nagpur_old

Nagpur flood : वस्त्यांमध्ये सुतकी वातावरण, मनामनात धडकी!

डागा, अंबाझरी लेआऊटवासी दशहतीत स्नेह जुळलेल्या साहित्याची नासधूस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गेली अनेक वर्षे घरातील उत्साह, नैराश्याच्या काळात विविध साहित्याची सवय झाली होती. तेच साहित्य अंगणात ठेऊन कचरागाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे, असे सांगून नकळतपणे ओलसर डोळ्यांकडे नागरिकांचे हात जात आहेत. त्यामुळे वस्त्यांमध्ये सुतकी वातावरण दिसत असून पावसाचे शिंतोडे उडले तरही धडकी भरत असल्याचे डागा लेआऊट, अंबाझरी ले-आऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता ले-आऊटमध्ये आज तिसऱ्या दिवशीहीचे चित्र आहे.

शनिवारी पावसाने थैमान मांडले अन् होत्याचे नव्हते झाले. सोमवारी तिसऱ्या दिवशी सूर्याने दर्शन देताच नागरिकांनी घरातील सोफे, बेड, गाद्या बाहेर काढल्या. या वस्तीत बाहेरून येणाऱ्यांना कदाचित हे सर्व साहित्य वाळविण्यासाठी अंगणात ठेवले असे वाटले असेल, परंतु सवय झालेले हे साहित्य घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या कचरा गाडीत टाकण्यासाठी असल्याचे एका महिलेने सांगितले.

घरातील प्लायवूडचा सोफा, गाद्या पाण्याने पूर्ण बेकार झाल्या.याशिवाय प्लायवूडचे तयार केलेले फर्निचरही आता कामाचे राहीले नाही. असे एका एका घरातील लाखोंचे साहित्य आज कचरा गाड्यात फेकताना प्रत्येकाचेच डोळे पाणावलेले दिसून आले.

घराच्या बाहेर वाळविण्यासाठी चपल, जोड्यांचा सडा तर कुठे घरातील रद्दी पेपर वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना नागरिक दिसून आले. डागा लेआऊट, अंबाझरी लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता लेआऊटमध्ये नादुरुस्त चारचाकी वाहनांवर कुठे चादर, सोफ्याचे कव्हर वाळताना दिसून आले.

त्याचवेळी श्रीमंतीत लोळणारे नागरिक थोडाफार किराणा आणून आजचा दिवस पुढे ढकलतानाचे विदारक चित्रही काही भागात आढळले. कुठे पाण्याने नासाडी झालेले तांदुळ गाईंसाठी ठेवले तर कुठे गहू तर कुठे कणकीचे गोळे दिसले. दुपारी चार वाजता आकाशात ढग जमल्यानंतर पुन्हा वाळायला टाकलेले साहित्य घरात घेऊन जाण्याच्या घाईतून बंगल्यातील असो की साध्या घरातील रहिवासी सर्वांचीच लाचारी दिसून आली. या वस्त्यातील नागरिकांत पावसाची दहशत असून घरातील निस्तेज चेहरे कधी फुलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक झाले धोबीघाट

घरातील ओले झालेले कपडे, सोफा कव्हर, चादर सारेच ओले झाले. आज सूर्याने दर्शन दिल्याने डागा लेआऊटमधील नागरिकांनी पुढेच असलेल्या स्केटिंग रिंकच्या भिंतीवर कपडे, सोफा कव्हर, चादर आदी वाळायला टाकले. ज्यांना भिंतीवर जागा मिळाली नाही, त्यांनी मोकळ्या मैदानावर कपडे वाळविण्यासाठी ठेवले होते. या रंगबेरंगी कापडांमुळे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकचे धोबीघाट झाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT