13 corona infected in Nanded district on Saturday esakal
नांदेड

नांदेडला कोरोनाने काढले डोके वर

शनिवारी १३ बाधित; ४४ जणांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) प्राप्त झालेल्या १३४ अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे १२ तर अँटिजेन तपासणीद्वारे एक अहवाल बाधित आला आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत सात, नांदेड ग्रामीण दोन, धर्माबादला एक, कंधारला एक, मुदखेडला एक तर अँटीजेन तपासणी द्वारे कंधार तालुक्यातंर्गत एक असे एकुण १३ अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख तीन हजार चार एवढी झाली असून यातील एक लाख २६८ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ४४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ एवढी आहे. दरम्यान, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील दोन रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरणात १८, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणात २४, अश्विनी हॉस्पिटलमध्ये दोन असे एकुण ४४ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण स्वॅब ः नऊ लाख १० हजार ७६१

  • एकुण निगेटिव्ह ः सात लाख ९० हजार ४१०

  • एकुण बाधित ः एक लाख तीन हजार चार

  • एकूण बरे - एक लाख २६८

  • एकुण मृत्यू ः दोन हजार ६९२

  • स्वॅब नाकारले ः दोन

  • उपचार सुरू ः ४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT