file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्याला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजूर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : या वर्षीच्या पावसाळयात जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बाधित शेतकर्‍यांना ही अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून पहिला व दुसरा टप्पा मिळून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी तब्बल 566 कोटींची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

या वर्षी नांदेड जिल्ह्यात विक्रमी पाऊस पडला. जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या व नाल्यांना आलेला पूर यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरपडी झाली. जनावरांचे गोठे वाहून गेले. अनेक जनावरे दगावली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत होती.

जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी २५ हजार

शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासनानी दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी २५ हजार मदतीची घोषणा केली होती. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी केल्या होत्या.

दुसर्‍या टप्प्यात २८२ कोटी असे एकूण ५६६ कोटी रक्कम मदत निधी

या सर्व बाबींचा परिणाम म्हणून ता.नऊ नोव्हेंबर २०२० रोजी निघालेल्या शासनाआदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २८४ कोटी तर ता. सात जानेवारी २०२१ रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसर्‍या टप्प्यात २८२ कोटी असे एकूण ५६६ कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाली आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT