file photo 
नांदेड

धर्माबाद तालुक्यातील सायखेड येथे अवैध देशी- विदेशी दारु विक्रेत्यांवर कारवाई

सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : धर्माबाद तालुक्यातील सायखेड येथे शनिवारी (ता. तीन) संध्याकाळी येथील एका किराणा दुकान व हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांना मिळाली असता त्या ठिकाणी छापा मारुन मुद्देमालासह आरोपींना अटक केल्यामुळे अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

धर्माबाद तालुक्यातील सायखेड येथे अवैधरित्या देशी व विदेशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. सदरील माहितीवरुन पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील सायखेड येथील एका किराणा दुकानात व हॉटेलमध्ये छापा टाकून सहा हजार ९२० रुपयांचे देशी व विदेशी दारु जप्त करुन आरोपी श्रीनिवास लक्ष्मण येम्मेवार व नागोराव संतराम वडपत्रे यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, हरीश मांजरमकर, पंडित कल्याणकर, संतोष आनेराये, संतोष भोसले यांनी केली.

जारीकोटमध्येही ठिकठिकाणी अवैध दारु विक्री जोमात 

तालुक्यातील जारीकोट येथे ठिकठिकाणी काही दिवसांपासून देशी- विदेशी दारुची खुलेआम विक्री सुरु आहे. त्यामुळे गल्लोगल्ली तळीरामांचा वावर वाढला असून महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. जारीकोट येथे सात ते आठ लोकांच्या घरी खुलेआम देशी विदेशी दारु विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत. याचा शोध वरिष्ठ पोलिस अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

प्रशासकीय सूचना धाब्यावर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कोरोनातील नियम, सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु कायद्याचा धाक मोजक्याच नागरिकांना दाखविला जात आहे. नियम मोडणाऱ्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अशांवर कारवाई होण्याची गरज आहे.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT