Organ Donation esakal
नांदेड

Organ Donation : आईच्या निधनानंतर मुलीनं घेतला मोठा निर्णय; 'या' कृतीमुळं होऊ लागलंय कौतुक

शासनाच्या देहदान चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचेही आवाहन रुपाली श्रीरामवार यांनी केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोविडच्या कठीण काळात शरीररचनाशास्त्र विभागात मृतदेह हा स्वीकारता येत नव्हता. त्या कारणाने विभागात मृतदेहाची कमतरता भासत होती.

नांदेड : बोधडी (ता. किनवट) येथील सविता माधव श्रीरामवार यांचे निधन झाल्यावर त्यांच्या इच्छेनुसार कन्या रुपाली माधव श्रीरामवार यांनी आईचे देहदान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीर रचनाशास्त्र विभागात केले आहे.

शासनाच्या देहदान चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचेही आवाहन रुपाली श्रीरामवार यांनी केले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी याबद्दल श्रीरामवार कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, देहदान केल्यानंतर कुटुंबीयांचे प्रशस्तीपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी डॉ. अनुजा देशमुख, डॉ. अनिस रहेमान तसेच जनऔषधी विभागाचे डॉ. इनामदार, नियोजन अधिकारी डोळे आदी उपस्थित होते. सविता माधव श्रीरामवार यांची देहदान करण्याची इच्छा होती. ती त्यांची कन्या रुपाली माधव श्रीरामवार यांनी पुढे येऊन पूर्ण केली.

त्या एक आशा वर्कर सुपरवायझर आहेत आणि त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोविडच्या कठीण काळात शरीररचनाशास्त्र विभागात मृतदेह हा स्वीकारता येत नव्हता. त्या कारणाने विभागात मृतदेहाची कमतरता भासत होती. कोविडनंतर देहदानाप्रती जनजागृती निर्माण होऊन बरेचजण आता पुढे येत आहेत.

मृत्यूनंतर देह हा जाळून, पुरुन नष्ट होण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणे, हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य आहे. यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढे यावे..

- डॉ. एस. आर. वाकोडे, अधिष्ठाता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT