क्राईम न्यूज नांदेड 
नांदेड

अमेरिकन डॉलरचे बक्षीस भारतीय चलनात देण्यासाठी सव्वा लाखाचा गंडा

विमा प्रतिनिधी वैजनाथ जीवन नायगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. एक जून ते ता. १६ जून दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर विविध दोन मोबाईलवरुन फोन आले.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : 15 हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस भारतीय चलनात बदलण्यासाठी लागणारे ना हरकत, कोरोना कर आणि जीएसटी भरा असे सांगून एका विमा प्रतिनिधीला एक लाख १३ हजार ९९५ रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अनोळखी तिघआंवर फसवणूकीचा गुन्हा दाकल करण्यात आला आहे.

विमा प्रतिनिधी वैजनाथ जीवन नायगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. एक जून ते ता. १६ जून दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर विविध दोन मोबाईलवरुन फोन आले. तुम्हाला १५ हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस लागले आहे असे सांगण्यात आले. ते अमेरिकन डॉलर भारतीय चलनात बदलण्यासाठी जीएसटी, कोरोना कर आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्या भामट्यांनी त्यांना एस. बी. आय. बॅंकेचे दोन खाते क्रमांक दिले.

हेही वाचा - युवतीचा विहिरीत तर पूरात अडकून वृध्दाचा मृत्यू; सेनगाव तालुक्यातील घटना

त्यावर वैजनाथ नायगावकर यांनी आमिषापायी एक लाख १३ हजार ९९५ रुपये भरले. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. विमानतळ पोलिसांनी या तक्रारीनुसार फसवणुक व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ड नुसार दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे करत आहेत.

विष्णुपुरी येथील तरुणाचा खून

नांदेड ः हडको ते वाघाळा मार्गावर विष्णुपूरी येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली. सदर मृताच्या शेजारीच त्याची दुचाकी पडलेली होती. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

येथे क्लिक करा - मुंबईच्या सेना भवन राड्यानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिलं खुलं आव्हान

अधिक माहिती अशी की, हडको ते वाघाळा मार्गावर दुचाकीच्या (एमएच- २६, बीजी- ७५४३) शेजारी एक इसम संशयास्पद मृत्यू पावलेल्या स्थितीत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास गुरुवारी सकाळी सहा वाजता आला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार मोहन हंबर्डे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या दुचाकीच्या नंबरवरुन सदर मृतदेह विष्णुपूरी येथील बाजीराव पंडितराव हंबर्डे (वय ३५) यांचा असल्याचे समजले.

पोलिसांनी मृताची तपासणी केली असता, त्याच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तसेच पायाला खरचटल्याचेही दिसून आले. मयत बाजीराव हंबर्डे हे बुधवारी दुपारी घराबाहेर पडला होता, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. दरम्यान या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT