file photo 
नांदेड

अर्धापुरात शाळा भरल्या विद्यार्थ्यांविना, पहिल्याच दिवशी बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी.शाळेचे फवारणी नाही

लक्ष्मीकांत मुळे
 

अर्धापुर (जिल्हा नांदेड): गेल्या आठ महिण्यापासून कोरोनामुळे बंद झालेली शाळेची घंटा शहरासह तालुक्यात बुधवारी (ता. दोन) वाजली खरी. पण विद्यार्थी काही शाळेकडे फिरकलेच नाही. शहरासह तालुक्यातील शासकीय व खाजगी शाळेत विद्यार्थी आलेच नाही. ज्या शाळेत विद्यार्थी आले ते चार ते पाच होते. शाळा व्यवस्थापनाने पालकांचे संमती घेवून येण्याच्या सुचना केल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस असा तसाच गेला. 

दरम्यान शाळेची स्वच्छता, निरजंतुकीकरण्याची जबाबदारी शासनाने स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे. पण शहरातील एकही शाळा निरजंतुकीकरण केली नाही. तर पालकांची अद्याप कोरोना विषयीची भिती गेली नाही. शिक्षणसाठी आपल्या पाल्यांच्या जीव धोक्यात घालण्याची सध्या तरी दिसून येत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील शाळा गेल्या आठ महिण्यापासून बंद आहेत. या काळात बहुतेक शाळांनी आॅनर्ईन पद्धतीने अभ्यास करून घेतला आहे. विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची सवय मोडली आहे. तसेच पाठीवर ना दप्तराचे ओझे ना वेळेवर शाळेत जाण्याची कटकट.ऊन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी मिळत होती त्यात कोरोनामुळे प्रदिर्घ काळासाठी सुटट्या मिळाल्यानंतर तब्बल आठ महिण्यापासून बंद आसलेल्या शाळा राज्यातील काही जिल्हात गेल्या आठवड्यात सुरू झाल्या. तर नांदेड जिल्हातील शिक्षकांची कोरोना तपासणी राहिल्याने जिल्ह्यातील शाळा बुधवारी (ता दोन)  सुरू करण्याचा निर्णय घेतला.

शाळेत एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होवू नये म्हणून नव्वी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.तसेच सम विषम पद्धतीने विद्यार्थी शाळेत बोलने, योग्य अंतर ठेवणे , मास्कचा वापर, हात धुणे, पालकांचे संमंती घेने, शाळा स्वच्छ करुन फवारणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनां विषयी माहिती दिली आहे. आज शाळेचा पहिला दिवस होता. शाळेकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत. शहरातील दोन खासगी व एका जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत केवळ चार ते पाच विद्यार्थी आले  व घरी निघून गेल्याची माहीती मुख्यध्यापकांनी दिली.तसेच पालकांचे संमंती पत्र घेऊन येण्याच्या सुचना दिल्या आहेत, येणा-या काळात सर्व नियमांचे काटेकोरटणे पालन करून शाळा सुरू  राहील आशी माहिती विविध शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली..

शहरातील ज्या शाळा सुरू झाल्या आहेत आशा शाळांची स्वच्छता व फवारणी नगरपंचायत तातडीने करेल आशी माहिती उपनगराध्यक्षा डाॅ पल्लवी लंगडे यांनी दिली.

कोरोनाचे संकट आद्याप गेले नाही.येणा-या काळात रूग्णांच्या संखेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिक्षण महत्वाचे आहे.पण जीवन आनमोल आहे.शाळ सुरू करून विद्यार्थ्यांवर प्रयोग का केला जातोय .काही जिल्हात शाळा बंद तर काही जिल्हात शाळा सुरू आशी धरसोड होत आहे.शाळा सुरू करण्या विषयी फेरविच्यार व्हावा आशी प्रतिक्रिया पालक लक्ष्मण सिनगारे यांनी दिली.

 

संपादन -प्रल्हाद कांबळे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT