Attempt rob petrol pump manager
Attempt rob petrol pump manager sakal
नांदेड

नांदेड : पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न फसला

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि. नांदेड) : पेट्रोल पंपावर जमा झालेले नऊ लाख ५४ हजार रुपये बँकेमध्ये भरण्यासाठी जाणाऱ्या व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून दुचाकी चोरट्यांनी त्यांच्याजवळील वरील रकमेची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला . मात्र व्यवस्थापकांनी बॅग सोडली नसल्याने चोरट्यांचा लुटीचा डाव फसला . या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अर्धापूर तालुक्यातील धामदरी पाटीजवळ ही घटना घडली .

मालेगाव येथील भारतीय स्टेट बँकेत पेट्रोल पंप व्यवसायातून जमा झालेले नऊ लाख ५४ हजार रुपये एका बॅगमध्ये टाकून दादाराव अशोक डाके हे आपल्या दुचाकीवरून जात होते . तेव्हा सकाळी दहाच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील धामदरी पाटीजवळ त्यांचा पाठलाग करीत एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न केला . परंतु दादाराव डाके यांनी गाडीवरील ताबा न जाऊ देता हातातील बॅग सुटू दिली नाही आणि वेगाने तिथून गाडी काढत चोरट्यांना गुंगारा दिला . त्यामुळे चोरट्यांचा लुटीचा डाव फसला .

चोरटे बजाज कंपनीची पल्सर दुचाकी क्रमांक ( एमएच३८-०८९ ३ ) वर आले होते . दादाराव डाके यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे करत आहेत .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT