File Photo 
नांदेड

प्रशासनाला ‘त्या’ २३ चालकांच्या अहवालाची प्रतिक्षा

शिवचरण वावळे

नांदेड : ‘लॉकडाउन’मध्ये नांदेड येथे अडकुन पडलेल्या पंजाबच्या यात्रेकरूस सोडण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील २३ चालक परतल्यानंतर त्यांच्या घशातील स्वॅब ‘कोरोना’ चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा नमुना अहवाल येणे अजून बाकी असतानाच शनिवारी (ता.दोन) जिल्ह्यात नव्याने २० रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे पंजाबला गेलेल्या ‘त्या’ २३ चालकांचे अहवाल निगेटिव्ह की पॉझिटिव्ह येणार याकडे जिल्हा प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.
 
दोन दिवसांपूर्वी श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील ९७ व्यक्तींचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील २० जणास ‘कोरोना’ची लागण, तर २५ ‘कोरोना’मुक्त आणि ११ व्यक्तींचा नमुना अहवाल अनिर्णीत अवस्थेत ठेवण्यात आले असले तरी, ९७ पैकी ४१ व्यक्तींचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ‘कोरोना’ रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून वर्तविली जात आहे. 

शनिवारी संध्याकाळपर्यंत अहवाल  होण्याची शक्यता
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शनिवारी (ता.दोन) मे सकाळपासून पुढच्या प्लॅनिंगसाठी जिल्हाप्रशासनाच्या बैठका सुरु केल्या आहेत. नांदेडहुन पंजाबला खुराणा ट्रॅव्हल्समार्फत २३ बस गेल्या होत्या. यामध्ये सचखंड गुरुद्वारा येथून दहा तर लंगर साहिबमधून १३ असे एकुण २३ बस गेल्या होत्या. त्यासर्व गाड्यांचे चालक नांदेडला दाखल होताच त्यांना गावाबाहेर थांबवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालय क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल शनिवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदेड जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधीतांची संख्या वरचेवर वाढत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. 

महापालिकेच्या हद्दीत रोज हजारो संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. यातील काही लोकांचे स्वॅब घेऊन चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. त्यातून रोज नव्याने धक्काधादक आकडेवारी पुढे येत आहे. 

 २४ ‘कोरोना’ बाधीतावर उपचार सुरु
शनिवारी (ता.दोन) सकाळी एक हजार २३५ संशयितांची नोंद करण्यात आली आहे. यातील एक हजार १२० पैकी एक हजार नऊ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ५६ संशयितांचे स्वॅब अहवाल येणे अजून बाकी आहे. तर १४ जणांचा अहवाल अनिर्णित आहे. जिल्ह्यातील २६ कोरोना बाधीत रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून सध्या २४ ‘कोरोना’ बाधीतावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीचे बंधन! महाविद्यालयांकडून विरोध अन्‌ बायोमेट्रिक हजेरीत शिथिलता; कुलगुरू म्हणाले, ‘मुले वर्गात यावीत, एवढाच उद्देश’

सोलापूर क्राईम ब्रॅंचची कारवाई! सोलापुरातील तरूणांना ‘एमडी’ ड्रग्ज पुरवणारा मुंबईचा मेहमूद दुसऱ्यांदा जेरबंद; कोर्टात नेण्यापूर्वी वाढला ‘बीपी’ अन्‌...

मोठी बातमी! शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता राज्यस्तरीय समिती; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; ‘या’ १६ तक्रारींवर मिळणार ३० दिवसांत निर्णय, वाचा...

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT