Ashok chavan
Ashok chavan Ashok chavan
नांदेड

ट्रॅफीक जॅम दूर करण्यासाठी पालकमंत्री लक्ष देतील का?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी चार हजार कोटींचा निधी दिला आहे. या निधीचा उपयोग लवकरच शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी होईल, अशी आशा असली तरीही गेल्या काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात रस्त्यावरील खड्डे व ट्रॅफीक जामचा वाईट अनुभव प्रत्येक वाहनधारकास येत आहे. याकडे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालावे अशी अपेक्षा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने व्यक्त केली आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे असल्याने चालकांना वाहने सावकाश न्यावी लागतात तर अनेक वेळा रस्त्यावरील खड्यांमुळे गाडी आदळून नियंत्रणाबाहेर जात असल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. या मुळे सावकाश जाणाऱ्या वाहनांना मागून धडक बसत आहे. यातून अनेक ठिकाणी वाहन चालकांमध्ये वाद होत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफीक जाम होणे टाळावेच लागेल. यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजणे आवश्यक आहे. या खड्ड्यांसोबत अनेक ठिकाणी रोडवर असलेल्या ड्रेनेजचे झाकण वेडेवाकडे बसविल्या गेल्याने त्या ठिकाणी ट्रॅफीक जाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी खड्डे व रस्त्यावरील अडथळे दूर करण्यास प्राधान्य द्यावे.

मोंढा ते वर्कशाॅप वन-वे रस्त्यावर वजिराबाद भागातील जैन मंदिरासमोर ड्रेनेजचे झाकण तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी वाहन धडकून अपघात होण्याची चिन्हे आहेत. अशी परिस्थिती शहराच्या अनेक रस्त्यावर आहेत. याच्या दुरूस्तीसाठी महापालिका प्रशासनाने प्राधान्य देणे आवश्यक आहे. तथा महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातात आहे, त्यामुळे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जातीने लक्ष घालावे अशी नांदेडकरांची अपेक्षा आहे.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून रस्ते चकाकणार हे नक्की असलेतरीही आता वाहनचालकांना रस्त्यावरील या खड्ड्यांपासून व वेड्यावाकड्या बसविलेल्या ड्रेनेजच्या झाकणापासून रस्ता सुरळीत करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे.
- रमाकांत घोणसीकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT