Bad Road Sakal
नांदेड

नांदेड : सिडकोतील रस्त्यांची वाट बिकटच !

मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याकडे सत्ताधाऱ्यांसह महापालिकेची पाठ

श्याम जाधव

नांदेड : सिडको(cidco) भागातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. या रस्त्यांची वाट; अजूनही बिकटच असून मुख्य रस्त्यासह अंतर्गतवाटेकडे सत्ताधाऱ्यांसह महापालिकेने(nanded carporation) पाठ फिरवली आहे.खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यावरून वाहने तर सोडा; कधी पायी चालणेही मुश्किल होत आहे. रस्त्यांवर अनेक खड्डे पडले असून, त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळ मोठ्या प्रमाणात उडते. या मुळे रस्त्याशेजारी राहणारे नागरिक तसेच व्यावसायिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिका प्रशासनाने रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्यांची बिकट अवस्था पाहता महापालिका सिडकोकरांवर आणखी किती जुलूम करणार हा प्रश्न आहे. अगदी राजकीय नेत्यांपासून नगरसेवकांपर्यंत(carporators) सर्वांनीच डोळे झाकले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सिडको भाग हा नांदेड शहराचा प्रमुख भाग आहे. त्यामुळे नांदेड शहराकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक जण पर्यायी मार्गाचा वापर करीत असलेतरी सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून येजा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. ठिकठिकाणी खड्डे, रस्त्यावर कधी नळाचे तर कधी दुर्गंधी युक्त पाणी नेहमीचेच. अशातून वाट काढावी लागते. याकडे ना राजकारण्यांचे लक्ष ना संबंधित भागातील नगरसेवकाचे.वाट लागलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीची वाट ही अधिक बिकट असून सिडकोकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या या रस्ता दुरुस्तीच्या कामास किती दिवस लागतील हे सांगणे कठीण असून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या भागातील महत्त्वाच्या मुख्य आणि अंतर्गत अंदाजे चार पेक्षा जास्त रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले तर नवलच.

जोपर्यंत नागरिक विचार करण्यास शिकणार नाहीत, तोपर्यंत कराचा पैसा असाच पाण्यात जाणार हे नक्की असून कधी कधी खड्डेमय रस्त्यांवर खडी टाकून मुलामा देण्याचा खटाटोप मात्र करण्यात येतो. महापालिका सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील मुख्य सह अंतर्गत रस्त्याची समस्या अद्याप कायम आहे. यातून पालिका प्रशासन कधी धडा घेईल? हा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांची नसलेली पकड या मुळे सिडकोकर समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत.

सिडकोतील रस्ते जणू सुस्थितीत आहेत. विरोधकांची काही एकही तक्रार नाही. सत्ता मिळवण्यासाठी विविध राजकीय पटलावरून कायापालट करण्याचे आश्वासन पक्षांकडून देण्यात आले. परत महापालिका निवडणूका जवळ येत आहेत. काय काम झाले किती विकास झाला हे मोठे कोडे आहे. सिडको तर सोडाच, नांदेड शहरात काही भागांतील रस्त्याची तीच अवस्था आहे. बांधकाम क्षेत्रात सिडको भाग झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत या भागातील विकास व्हावा, पण अजूनतरी सिडको शहरवासीयांना वाटच पाहावी लागणार असे वाटते.

- विशाल वाघमारे.

२००५ सिडको महापालिकामध्ये हस्तांतरित झाली तेव्हापासून ते २०२१ पर्यंत सिडको मुलभूत विकासापासून दूर आहे. रस्ता, नाली, ड्रेनेज जैसे थे आहे. खोदलेले रस्ते धुळ यामुळे जनता त्रस्त आहे, नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोचा विकास होईल कधी हा प्रश्नचिन्ह आहे.

- कृष्णा पांचाळ, नागरिक.

गेल्या अनेक वर्षापासून सिडको-हडकोचे रस्त्याचे काम होत नाहीत. जनतेला अतोनात सारखी कसरत करून गाडी चालवावी लागते आणि रस्त्यावर पायी चालणाऱ्या लोकांनाही फार त्रास होत आहे. सत्ताधारी पक्ष असूनही काम होत नाही. महानगरपालिका येथे वाघाळा नाव लावलेले आहे या नावाचा अर्थाचा अनर्थ करताहेत. सिडको-हडकोकडे दुर्लक्ष करत आहेत.

- विनोद सूत्रावे, नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT