file photo 
नांदेड

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद येथील फुलेनगरात थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी महावितरण कंपनीच्या सहायक शाखा अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. शिवाय विनापरवाना, अवैधरित्या विजेची चोरी करणाऱ्या आरोपींविरूद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम सुरु आहे. या शहरातील फुलेनगर येथे थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी शहर शाखेचे सहायक अभियंता शाखा श्री. काळे, कर्मचारी संतोष पांचाळ, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. उपलवड हे गेले होते.

धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

यावेळी आरोपी शेख आरिफ बाबू यांने महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. वीज पुरवठा खंडित करत असताना कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली. यावेळी आरोपी शेख आरिफ बाबू आणि आरोपी अहेमदखान खलीलखान यांनी मारहाण केल्याप्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT