Farmer Rain Waiting
Farmer Rain Waiting Sakal
नांदेड

Rain Update : पावसानं ‘आभाळमाया’ पातळ केली..! भोकरला पाऊस नॉटरिचेबल

सकाळ वृत्तसेवा

Bhokar News - पाऊस सरीनं मातीचा सूगंध आसमंतात दरवळतो आणि रध्रांनाही धुमारे फुटु लागतात... धरतीला नवचैतन्य बहाल करणाऱ्या श्रावण सरीनं धरती हिरवाकंच शालू पांघरूण नववधू सारखी मुरकत असते...शेतकऱ्यांच्या घरी-दारी जणु लक्ष्मीचा वास असतो. असा लाभदायक पाऊस सरड्या सारखा रंग बदलतो आहे.

यंदा तर पार डोळे वटारल्याने खरीप हंगामावर संक्रांत आली आहे. पाऊस ‘नॉटरिचेबल’ झाल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पावसाची शेतकऱ्यांवरील ‘आभाळमाया’ दिवसेंदिवस पातळ होत आहे. दुष्काळाशी सामना करावा लागतो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलवणारा पाऊस ‘संजीवनासम’ मानला जातो. पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी असुनही पाण्यासाठी तरसावे लागते. निसर्ग चितपठ करून शेतकऱ्यांना हुलकावणी देण्याचे काम करत आहे. पर्यावरणाचे संतूलन बिघडल्याने ‘ऋतु’ चक्रावर त्याचा अनिष्ठ परीणाम होत आहे.

दरवर्षी बदलणारे ‘ऋतु’ आता मात्र मनमानी करताना दिसत आहे. तालुक्यातील पर्जन्यमान हे ९०० ते एक हजार मिलीमीटर आहे. मागील काहीवर्षी सरासरी ओलांडली होती. आता पाच सहा वर्षांपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असली तरी भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाही. सिंचनाची सोय नसल्यामुळे बहूतांश शेतकरी भिस्त निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. निसर्ग पूर्वी सारखा ‘सोबती’ राहिला नाही. मागील तीन-चार वर्षांपासून वरूणराजाने शेतकऱ्यांना सळोकी पळो करून सोडलं आहे. यंदा तर पावसाळ्याच्या पहिल्याच चरणात पाऊस ‘गायब’ झाल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या.

पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने कोरड्या रानातच पेरणी करण्याचे धाडस केल आहे. कोवळीलस रोपटे माना टाकत असताना जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अक्षरशा तालुक्यात ढगफुटी परिस्थिती निर्माण झाली.

पीके टाकत आहेत माना...

अतीवृष्टी झाल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी लगत असलेल्या शेतीची खरडपट्टी झाली. ऊसनवारी करून कशीबशी काळ्या आईची ओटी भरली ते पण हिरावून घेतली‌. यातून सावरत असतानाच पुन्हा पावसाने विश्रांती घेतली अद्दाप पाऊस बरसला नाही.

सोयाबीन, मुग, ऊडिद, ज्वारी, कापसाला आणखी पावसाची गरज आहे. उकाडा वाढला असून उन्हामुळे पीके माना टाकत आहेत. पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी चिंताग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. श्रावणात जणु ऊन्हाळ्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT