file photo
file photo 
नांदेड

बिलोली नगरपरिषद झाली थकबाकीमुक्त; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचा पुढाकार 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : घरगुती, व्यावसायिक ग्राहकांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने मार्च अखेर जोरदार प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नातूनच बिलोली नगरपरिषदही ९ लाख ५० हजार रूपयांची एकरकमी थकबाकी भरून थकबाकीमुक्त नगर परिषद झाली आहे.

महावितरणच्या देगलूर विभागाअंतर्गत येणाऱ्या बिलोली नगर परिषदेकडे पाणीपुरवठा योजनेचे चालू बिलासह ८ लाख ३० हजार रूपयांचे वीजबील थकीत होते. तर पथदिव्याचे १ लाख २० हजार रूपये वीजबील थकीत होते. देगलूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार यांनी मार्च अखेर थकबाकी वसूलीसाठी पत्र, सुसंवाद त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा करुन थकीत वीजबील वसूलीसाठी प्रयत्न केल्यामुळे चालू वीजबीलासह संपूर्ण थकबाकी वसूल करण्यात यश मिळवले.

थकबाकीमुक्त झाल्यामुळे बिलोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी  ज्ञानेश्वर ठोंबरे व नगराध्यक्ष मारोती पटाईत यांचा महावितरणच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. संपूर्ण थकबाकी वसूल केल्याबद्दल बिलोली नगरपरिषद व देगलूर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्ताञय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT