नांदेड - महापालिकेच्या सोमवारी दुपारी झालेल्या आॅनलाइन विशेष अर्थसंकल्प सभेला महापौर मोहिनी येवनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.  
नांदेड

नांदेड महापालिकेच्या सभेत अर्थसंकल्प सादर; महापौरांना सर्वाधिकार 

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सोमवारी (ता. पाच) दुपारी विशेष अर्थसंकल्पीय सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि सदस्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना मांडल्या. त्याचबरोबर याबाबतचे सर्वाधिकार महापौर मोहिनी येवनकर यांना देण्यात आले. 

नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी चार वाजता घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू, सभापती संगीता डक पाटील, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. 

आयुक्त, सभापतींनी केला होता सादर
महापालिकेचा प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ता. दहा मार्च रोजी स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांना अर्थसंकल्प सादर केला होता. २०२० - २०२१ चा मूळ अर्थसंकल्प हा ८९४ कोटी २४ लाख रुपयांचा होता. तो सुधारित ६७८ कोटी ३५ लाख रुपयांचा झाला. तसेच २०२१ - २०२२ या वर्षीचा ६४५ कोटी ५७ लाख रुपयांचा आणि एक लाख ७६ हजार ६५४ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती गाडीवाले आणि सदस्यांनी त्यावर अभ्यास करून अर्थसंकल्प तयार केला. सभापती गाडीवाले यांनी महसुली आणि भांडवली अशी एकूम ३१६ कोटी ८५ लाख रुपयांची वाढ सुचवून ९६२ कोटी ४२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचबरोबर त्यात काही महत्वाच्या तरतूदीही केल्या होत्या. 

पदाधिकारी, सदस्यांनी मांडल्या सूचना
या अर्थसंकल्पावर महापौर येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आॅनलाइन सभेत चर्चा झाली. यावेळी पदाधिकारी आणि सदस्यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. कोरोना संसर्गाची साथ लक्षात घेता आरोग्यावरील सोयी सुविधांवर भर देण्याबरोबरच मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यावरही यावेळी चर्चा झाली. 
 
हेही वाचलेच पाहिजे - एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्य मुके; बोलता येत नाही मात्र त्यांचा संवाद पाहून...

 

आठवडाभरात मंजूर - महापौर
विशेष अर्थसंकल्पीय सभेत पदाधिकारी, सदस्यांनी महत्वपूर्ण सूचना आणि मागण्या मांडल्या आहेत. अर्थसंकल्पासाठी आलेल्या या सूचनांचे स्वागत असून त्यावर अभ्यास करून व त्यात योग्य ते बदल करून येत्या आठवडाभरात अर्थसंकल्प तयार करून तो मंजूर करण्यात येईल. 
- मोहिनी विजय येवनकर, महापौर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसचं आमंत्रण; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत उच्चस्तरिय बैठक

Bank Layoff: IT नंतर आता बँकिंग क्षेत्रातही नोकरकपातीचं वादळ; AI आणि रोबोट्समुळे 7000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Private School Fees: खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Unseasonal Rain : रांजणगाव खुरी उरुसात अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्याने स्टॉल, रहाट पाळणे कोसळले, लाखोंचे नुकसान

Bhendala Assault Case: भेंडाळा गावात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; छेडछाडीला विरोध केल्याचा संतापजनक परिणाम, प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT