File photo 
नांदेड

शालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, काय आहे कारण?

प्रमोद चौधरी

नांदेड : सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांची पुस्तके शासन उपलब्ध करून देते, यासोबत सर्वच माध्यमांची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याचा परिणाम पुस्तक विक्रीच्या व्यवसायावर झाला असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास पन्नास टक्के पुस्तकांचा साठा तसाच पडून आहे. त्यामुळे शालेय पुस्तके विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे. 

कोरोनामुळे २४ मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी, विद्यार्थी शाळेत यायला तयार नाहीत. त्यामुळे बहुतांश शाळांनी आॅनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली. परंतु, अनेकजण लाॅकडाउनमुळे बाहेरगावीच असल्याने शालेय पुस्तकांची खरेदी केलेली नही. त्यामुळे शालेय पुस्तक विक्रेते आर्थिक संकटात आले आहेत.

विद्यार्थी आणि पालकांचे दहावी तसेच बारावीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष असते. शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे राहते. या शैक्षणिक सत्रात शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण पद्धती अनेकांच्या मते पूर्णपणे यशस्वी नाही. परंतु ऐनवेळी शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शाळांमधून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा पुस्तके विक्रेत्यांशी संलग्नित असतात, म्हणजे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेली पुस्तके, शालेय साहित्य त्याच दुकानातून घेण्याचे बंधण आहे. त्यामुळे असे विक्रेते फायद्यात असतात. 

५० टक्के साठा पडूनच
दरम्यान, पहिली ते नववीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांसाठी पुस्तकेच विकत घेतलेली नाहीत. शहरात शालेय पुस्तके व साहित्य विक्रीची पन्नास दुकाने आहेत. हा व्यवसाय जून ते ऑगस्ट जोमात चालतो. त्यानंतर वर्षभर पर्यायी शैक्षणिक साहित्याचीच मागणी असते. या वर्षात बोलविलेला पुस्तकांचा जवळपास पन्नास टक्के साठा तसाच दुकानांमध्ये पडून आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले. 

येथे क्लिक कराच - नांदेड जिल्हयातील तांड्यांचा चेहरा-मोहरा बदलणार, कसा? ते वाचाच
 
पुस्तक घेण्यासाठी शाळांकडून तगादा 
शाळा केव्हा सुरू होईल, याबाबत निश्‍चिती नाही. पण दुकानांचे नाव सांगून पुस्तके घ्यावीच लागतील, असा तगादा काही खासगी शाळांकडून लावल्या जातो. शैक्षणिक नुकसानीची भीतीही दाखविल्या जाते. पालकसुद्धा पाल्यांना भविष्यात त्रास होईल म्हणून बोलायला तयार नाहीत. 

दिवाळीच्या सत्रानंतरतरी अर्ध शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली पाहिजे. असे झाले नाहीतर दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या पुस्तकांना वर्षभर सुरक्षित ठेवण्याचे आव्हान विक्रेत्यांपुढे असणार आहे. परिणामी विक्रेत्यांना आर्थिक झळ सोसावी लागेल, याचा शासनाने विचार करावा, एवढीच अपेक्षा आहे. 
- हनुमान मणियार, शालेय पुस्तक विक्रेते,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT