file photo 
नांदेड

रामतीर्थ शिवारात मिरचीच्या पिकात गांजाची लागवड- दिव्यांग शेतकरी पोलिस कोठडीत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रामतिर्थ शिवारात एका शेतात मिरचीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी रामतिर्थ, बिलोली पोलिसांच्या मदतीने बुधवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास कारवाई केली. यावेळी पोलिसांनी साडेचार किलो वजनाचे गांजाची झाडे जप्त केली. तसेच दिव्यांग असलेल्या शेतकऱ्यास अटक केली. त्याला बिलोली न्यायालयासमोर गुरुवारी (ता. ११) हजर केले असता न्यायाधीश विक्रमादीत्य मांडे यांनी सोमवार (ता. १५) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ शिवारात एका शेतात लावलेली गांज्याची एकूण चार किलो 600 ग्रॅम वजनाची झाडे पोलिसांकडून जप्त केली आहेत. त्याची किंमत 23 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, दहा मार्च रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त माहितीनुसार रामतीर्थ शिवारामधील शेत गट क्रमांक 355 मध्ये मिरचीच्या पिकात गांजा या अमली पदार्थांची लागवड केली होती.

त्यानुसार त्यांनी आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे, पोलिस अमलदार संजय केंद्रे, विलास कदम, नवघरे, पठाण, देवा चव्हाण, विठ्ठल शेळके आणि हेमंत बीचकेवार यांना त्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी पाठवले. माहिती अत्यंत खात्रीशीर होती म्हणून अमली पदार्थ प्रतिबंधक नियमावलीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याबद्दलची माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेत गट क्रमांक 355 कडे रवाना केले. पथकासोबत बिलोलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, नायब तहसीलदार ओम प्रकाश गौड, रामतीर्थ ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव पुरी, पोलिस उपनिरीक्षक आर. घाडगे, पोलिस अंमलदार राठोड, पठाण हे सर्व रात्री उजेड करता येईल असे फोकस घेऊन शेत गट क्रमांक 355 मध्ये पोहोचले.

त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते. या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी खोपीत झोपलेल्या व्यक्तीची विचारपूस केली तेव्हा त्याने आपले नाव नागोराव तुकाराम देगलूरे सांगितले. शेत गट क्रमांक 355 हे तुकाराम नागोराव देगलुरे यांचे आहे. पण ते दिव्यांग असल्याने शेती पिकवू आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी मिरचीच्या पिकांमध्ये गुपचूपपणे गांजाच्या झाडांची लागवड केली होती. पोलिसांनी ती झाडे जप्त करुन त्यांनाही अटक केली. रामतिर्थ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अमलीपदार्थ कलमान्वये गुन्हा दाखल केला. यानंतर गुरुवारी (ता. ११) रामतीर्थ पोलिसांनी तुकाराम नागोराव देगलूरे यांना बिलोली न्यायालयासमोर हजर केले. जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी देगलुरे यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT