file photo 
नांदेड

दिपावली उत्‍सव साध्या पध्दतीने साजरा करा - जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

प्रल्हाद कांबळे

नांदेड  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 तरतुदीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा 13 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून त्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सहा नोव्‍हेंबर रोजी निर्गमित केले आहेत.

जिल्‍ह्यामध्‍ये अद्यापही कोरोनाचे रूग्‍ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्‍य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्‍यात आलेले सर्वर धर्मीय सण/उत्‍सव अत्‍यंत साध्‍या पध्‍दतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्‍सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्‍य उत्‍सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्‍यंत साध्‍या पदधतीने साजरा करावा.  

दिपावली उत्‍सव घरगुती स्‍वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्‍यात यावी

कोवीड संसर्गामुळे बंद करण्‍यात आलेली राज्‍यातील धार्मीक स्‍थळे अद्याप खुली करण्‍यात आलेली नाहीत. त्‍यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्‍सव घरगुती स्‍वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्‍यात यावी. उत्‍सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्‍येष्‍ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्‍याचे शक्‍यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठया प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्‍कचा वापर आणि सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.  

नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्‍याचे टाळावे

दिपावली हा दिव्‍यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्‍सवा दरमयान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात येते. त्‍यामुळे वायु व ध्‍वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्‍यांच्‍या तसेच प्राणीमात्रांच्‍या आरोग्‍यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्‍सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्‍या अनेकांना फटाक्‍यांच्‍या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्‍याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्‍याचे टाळावे, त्‍याचा त्रास होऊ शकतो. त्‍याऐवजी दिव्‍यांची आरास मोठया प्रमाणावर करून उत्‍सव साजरा करावा.             

सार्वजनिक उपक्रम, दिपावली पहाट आयोजित करण्‍यात येऊ नये 

या उत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम,कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्‍यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्‍यास ऑनलाईन केबल नेटवर्क, फेसबुक इत्‍यादी माध्‍यमांद्वारे त्‍याचे प्रसारण करावे.  सांस्‍कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्‍तदान, आयोजीत करण्‍यास प्राधान्‍य  देण्‍यात यावे आणि त्‍यादवारे कोरोना, मलेरिया, डेंग्‍यु इत्‍यादी आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करण्‍यात यावी. मात्र त्‍या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता घ्‍यावी. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुर्नवसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष उत्‍सव सुरु होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत काही सूचना नव्‍याने प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवासमुह, भारतीय दंडसंहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. असे आदेश 6 नोव्‍हेंबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सही व शिक्‍यानिशी निर्गमीत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT