Chief Minister Uddhav Thackeray has reviewed the Gram Panchayat elections in Nanded district 2.jpg 
नांदेड

ग्रामपंचायत निवडणुकीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांकडून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे माहिती जाणून घेतली. नांदेड जिल्हा उत्तर प्रमुख दत्ता कोकाटे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी दिली.

नांदेड जिल्ह्यातील एक हजार पंधरा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकवून ग्रामीण भागात विकासाची गंगा सर्वदूर पोहोचवा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेला जिंकून देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. शिवसेनाप्रणीत पॅनल उभे करण्यात आले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याने सध्या जिल्ह्यातील निवडणुकीची काय स्थिती आहे. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून  जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी नांदेड जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सध्याचा परिस्थितीबाबत माहिती दिली. सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकेल अशी माहिती यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT