file photo 
नांदेड

विधायक बातमी : बेघर असलेल्या शांताबाई खोबेसाठी निवघा ग्रामपंचायत सरसावली

बंडू माटाळकर

निवघाबाजार ( जिल्हा ) : येथे गत २५ ते ३० वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या शांताबाई खोबे या येथील दुसऱ्याच्या जागेत राहतात. त्यांचे पती जिल्हा मध्यवर्ती बँकेत नौकरीला होते. काही कारनास्तव त्यांची नौकरी गेली व त्याना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यानी खाट धरली. तेंव्हापासून घर संसाराची जबाबदारी शांताबाई यांच्यावर आली. त्या सुभाष कदम कोहळीकर यांच्या जागेत राहत होत्या.

सुभाषराव कदम यांनीही त्यांना आपली बहीणच मानून त्यांच्याकडून आजपर्यंत एक रुपयांही भाड्यापोटी कधी घेतला नाही. कालांतराने शांताबाई यांच्या पतिचे निधन झाले. आणि घराला गरीबीचे दिवस आले! घरात चार तोंड खाणार असल्याने संसाराची सर्व जवाबदारी शांताबाई यांच्यावर आल्याने त्यानी घरगूती खानावळ म्हणून चार दोन डब्बे पुरवून शांताबाई आपला उदरनिर्वाह भागवत होत्या. त्यांना निवघा बाजारात राहण्यासाठी जागा घेणे म्हणजे दिव्य स्वप्नच होते. अत्यंत हलाखीच्या परीस्थीती मधे आपल्या आयुष्याची गुजरान करणाऱ्या खोबे बाईंची व्यथा निवघा बाजार येथे नवनिर्वाचीत ग्रामपंचायतच्या पॅनलप्रमुख मधूकर कदम यांच्याकडे मांडल्या. मधुकर कदम यानी सरपंच व सदस्याना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतच्या हक्काच्या जागेत त्यांना घरासाठी जागा मिळवून दिली. नुसती जागा देऊन काहीच होणार नाही हे जाणून या सर्वांनी आर्थिक मदत करुन त्यांना तात्पुरते स्वरुपात पत्र्यांचे टिनशेड उभारुन देणार असल्याचे सांगत समाजातील दानशुरांनी समोर येऊन शांता बाईंना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही या वेळी बोलतांना मधुकर कदम यांनी केले.

पाडव्याच्या सनाच्या दिवशी घरासाठी जागा देऊन निवघा ग्रामपंचायतीने माझ्यासारख्या निराधार, वंचीत महिलेचा पाडवाच साजरा केला त्यांचे ऋृण मी शब्दांत व्यक्तच करु शकत नसल्याच्या भावना श्रीमती शांताबाईंनी यावेळी व्यक्त केल्या. वंचित माहिलेला घरासाठी एक रुपयाही न घेता जागा उपलब्ध करुन देत निवघा ग्रामपंचायतने निभावलेल्या सामाजिक दायित्वाचे कौतूक सबंध निवघा नगरीसह पंचक्रोशीत होत आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT