file photo
file photo 
नांदेड

डिजेवरील ठेका भोवला; हदगावचे पीआय हनुमंत गायकवाड नियंत्रण कक्षात

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राम मंदीर बांधकाम वर्गणी जमा करण्याच्या मिरवणुकीत रामभक्तांसोबत रविवारी (ता. १४) कर्तव्यावर असतांना युनीफाॅर्ममध्ये बेधूंद होऊन डीजेवर ठेका धरणे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना चांगलाच अंगलट आला. या प्रकरणात पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी गायकवाड यांची नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे.

रविवारी (ता. १४) फेब्रुवारी रोजी डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या हदगाव येथील पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी एका धार्मिक मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर लोकांसोबत ठेका धरला होता. हनुमंत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मिर्झा बेग यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आले होते. या निवदेनाची व श्री. गायकवाड यांच्या ठेक्याची चित्रफित (क्लिप) सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्याची बदनामी झाली. ही बाब गंभीर असल्याचे व आपल्या कर्तव्यात कसुर केलेल्या गायकवाड यांना नियंत्रण कक्षात पाठविले आहे. 

श्री. गायकवाड यांनी पोलिस दलात काम करताना कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची जबाबदारी पार पाडणाऱ्यांनीच कायद्याचे उल्लंघन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या डीजे बंदीचे उल्लंघन करुन ठेका धरलेल्या श्री गायकवाड यांना चांगलाच अंगलट आला. श्री. गायकवाड हे नुकतेच हदगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. श्री. गायकवाड यांनी धरलेला ठेका अखेर बेसूर झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT