biometric attendance sakal
नांदेड

Nanded : कोरोना संपला तरी बायोमॅट्रिक बंदच

पाच‌ दिवसांचा आठवडा झाला तरी उशिरा यायचे लवकर जाण्याचा शिरस्ता कायम

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने पांच दिवसाचा आठवडा केला. हे करित असतांना कार्यालय सुरू होण्याचा वेळ एक घंटा आधी तर कार्यालय बंद ‌‌‌‌‌‌करण्याचा वेळ एका तासाने वाढविण्यात आला. पण हे वेळ वाढवून देण्यात आला असला तरी एकही कर्मचारी व अधिकारी वेळेच्या आधी येत नाहीत व वेळ झाल्यावर कार्यालय सोडत नाहीत. तालुकासस्तरीय काही कार्यालयात बायोमेट्रिक उपकरणे वापरून उपस्थितची नोंद घेण्यात येत होती. पण गेल्या तीन वर्षांपासून ही उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वेळेचे बंधन पाळणे ही एक दुर्मिळ बाब झाली आहे. यात नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो, त्यांना शासकीय कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची देवा सारखी वाट पाहावी लागते.

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी करुन पाच दिवसांचा आठवडा करुन घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पण त्या सोबतच कामाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यालयात उशिरा येण्याचे व कार्यालय बंद करण्याच्या वेळेच्या आधीच आवरा आवर करुन घरी जाण्याची घाई करण्याचें चित्र पाहायला मिळते.

तर काही कार्यालयातील विभाग प्रमुखच उशिरा येत असल्याने तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न अभ्यागतांना पडतो. शहरातील नगरपंचयात, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदी कार्यालयात बायोमेट्रिक उपकरणे लावण्यात आली होती. ती उपकरणे कोरोना सुरू होण्यापूर्वीच बंद पडली होती. कोरोना काळात बायोमेट्रिक उपकरणे वापरून उपस्थितची नोंद करणे बंद करण्यात आले होते. सध्या कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आहे. पण बायोमेट्रिक उपकरणे बंद आहेत. या उपकरणाद्वारे उपस्थितीची नोंद घेतली जात नाही.

नवीन शासनाच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालये सकाळी साडे नऊ वाजता उघडणे व सायंकाळी साडेसहा वाजता बंद करणे आवश्यक आहे. पण या आदेशाचे पालन कोणत्याही कार्यालयात पालन केले जात नाही.कोणताही अधिकारी व कर्मचारी वेळेआधी येत नाही व वेळ झाल्यावर कार्यालय बंद करण्यात येत नाही. शहरातील काही कर्मचारी टिवल्याबावल्या करित मोबाईलवर गेम खेळणे, प्रदीर्घ संभाषण करणे हे चित्र नेहमीचेच झाले आहे. आशा कामांत कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोण वठणीवर आणानार ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT