IMG-20200524-WA0027.jpg 
नांदेड

चायना टू मुखेड, व्हाया मुंबई - पुणे

सुनिल पौळकर


मुखेड, (जि. नांदेड) ः गेल्या दाेन - अडीच महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या काेराेना विषाणूंमुळे सुरवातीला सर्वांनीच काळजी घेतली हाेती. मात्र, दाेन आठवड्यांपासून बंदिस्त झालेल्या जनतेने माेकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करताच चीनच्या वुहाणमधून निघालेला काेराेना मुंबई-पुणे मार्गावरून पाच बाधित रुग्णांच्या माध्यमातून मुखेडात दाखल झाला आहे.

भीतीचे वातवरण
अमेरिका, इटलीसारख्या बलाढ्य सुसज्ज देशात काेराेना महामारीने थैमान घातल्याचे दिसून येताच देशभरात लाॅकडाऊनचा पर्याय वापरण्यात आला हाेता. यादरम्यान पहिले दाेन आठवडे मेट्राे शहरांत असलेल्या या विषाणूचा त्या ठिकाणाहून चाेरट्या मार्गाने पलायन केलेल्या नागरिकांच्या माध्यमातून विभागीय स्तरावर पाेचला होता. मात्र, आठ दिवसांपूर्वी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी भागातील मजुरांना परतीची परवानगी मिळताच स्थानिकांनी धास्त घेतली हाेती. त्यातच टेंभुर्णी (ता. नायगाव) येथील मुखेड भागात फिरलेला एक प्रवाशी काेराेनाबाधित असल्याचे स्पष्ट हाेताच तालुक्यात काही अंशी भीतीचे वातवरण निर्माण झाले हाेते. 


लागलीच रावणकाेळ (ता. मुखेड) येथील दाेघा जणांनाही काेराेनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे चिंतेमध्ये भरच पडली. तर दाेन दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी व एका परिचारिकेचा अहवाल पाॅझिटिव्ह येताच शहरात पुन्हा जनता कर्फ्यू लागला असून गजबजू लागलेले रस्ते पुन्हा सुनसान झाल्याचे चित्र दिसत आहे. टेंभुर्णी येथून आलेला रुग्ण दहिसर (मुबंई) येथून आला हाेता, तर रावणकाेळा येथील रुग्ण पुणे येथून आल्याचे सांगण्यात आले. यामुळे अडीच महिन्यांखाली चीनच्या वुहाणमधून निघालेला काेराेना लाॅकडाउनची सीमारेषा आेलांडत व्हाया मुंबई-पुणे मार्गे अखेर मुखेडपर्यंत पाेचल्याने जनतेमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT