Nanded News 
नांदेड

नांदेडच्या सीईओ वर्षा ठाकूर यांना कोरोनाने गाठलेच

प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वर्षा ठाकूर-घुगे शुक्रवारी (१९ मार्च २०२१) कोरोना बाधित झाल्या आहेत. त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

वर्षा ठाकूर यांची २८ सप्टेंबर २०२० रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. २४ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. रुजु झाल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून त्यांनी दमदारपणे कामाला सुरुवात केली. प्रत्येक विभागाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना शिस्तीचे पाठ गिरवले. शिवाय कोरोनाच्या महासंकटामध्येही ग्रामीण भागांमध्ये दौरे केले. शासनाच्या कोवीड नियमावलींसोबतच वैयक्तिक स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये जनजागृती केली. जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून त्यांनी योग्यती खबरदारी घेतली होती.

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाची ॲंटीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, सीईओ यांचे स्वीय सहाय्यक अभय नलावडे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सीईओ वर्षा ठाकूर यांनीही दोन दिवसांपूर्वी अॅंटीजन चाचणी केली होती. तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर गुरुवारी (ता.१८) पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली असता, त्यांचा अहवाल शुक्रवार पॉझिटिव्ह आला आहे.

२४ सप्टेंबर २०२० पासून कोरोना योद्धा म्हणून वर्षा ठाकूर यांनी अखंडितपणे फिल्डवर काम करत आहेत. मात्र, शुक्रवारी त्यांना कोरोनाच्या संसर्गाने गाठलेच. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांनी सिटीस्कॅन केले. त्यामध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे वर्षा ठाकूर यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले. दरम्यान दैनंदिन कामकाजात कुठेही खंड पडू दिला जाणार नाही. शासकीय निवासस्थानातून कोविड नियमावलींचे पालन करून कामकाज करणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT